Goa crime thriller film Dainik Gomantak
गोवा

'सस्पेन्स, ॲक्शन आणि बरंच काही.. उलघडणार गुन्हेगारी जगातील थरारक कथा; 'Thugs of Goa' तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात

Thugs of Goa movie: गुन्हेगारी जगातील एक थरारक आणि रोमांचक कथा 'ठग्स ऑफ गोवा' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

Akshata Chhatre

Thugs of Goa cast and release: गुन्हेगारी जगातील एक थरारक आणि रोमांचक कथा 'ठग्स ऑफ गोवा'  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. साई पाटील फिल्म फॅक्टरी निर्मित हा हाय-ऑक्टेन क्राईम थ्रिलर चित्रपट शुक्रवार (३० मे) रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. सस्पेन्स, दमदार अभिनय आणि कायदा विरुद्ध गुन्हेगार यांच्यातील तीव्र संघर्ष या चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्ये असणार आहेत.

'ठग्स ऑफ गोवा' थरारक अनुभव देणारा चित्रपट

दिग्दर्शन, लेखन आणि निर्मिती साई पाटील यांनीच केली असून, ठग्स ऑफ गोवा हा एक रोमांचक अनुभव देणारा एक चित्रपट असणार आहे. उत्तर गोव्यातील  शिवोली आणि व्हागतोरच्या गूढ आणि अंधाऱ्या परिसरात चित्रपटाची कथा घडते.

अमर अग्निहोत्री (सूर्यांश त्रिपाठी) नावाचा एक हुशार ठग, आपल्या साथीदारांसोबत, सलोनी (गायत्री बन्सोडे), नेहा (रुचिका सिंग) आणि विकी (मनवीर सिंग) यांच्यासोबत फसवणुकीच्या जगातील खेळ हदवून आणतो.  

राजकारण, फसवणूक आणि संघर्षाची गाथा

इन्स्पेक्टर विजय (सागर पब्बाले) गृहमंत्रीच्या मुलाच्या (राकेश कुमार - हर्षित उपाध्याय) काळ्या पैशांच्या व्यवहारांचा पर्दाफाश करण्यासाठी नेहावर हेरगिरी करण्याची सक्ती करतो. नेहा एका धोकादायक मोहिमेत अडकते, तेव्हा अमरला कायद्याशी दोन हात करावे लागतात. 

दमदार कलाकारांची फौज आणि तांत्रिक बाजू

'ठग्स ऑफ गोवा' मध्ये सूर्यांश त्रिपाठी (अमर अग्निहोत्री), गायत्री बन्सोडे, रुचिका सिंग आणि मनवीर सिंग (अमरचे साथीदार) असा एक मजबूत कलाकारांचा गट चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सागर पब्बाले इन्स्पेक्टर विजयच्या भूमिकेत आहेत, तर हर्षित उपाध्याय राकेश कुमार आणि प्रणय तेली गृहमंत्र्यांच्या भूमिकेत आहेत.

साई पाटील यांनी दिग्दर्शन, लेखन, निर्मिती आणि पटकथा/संवाद लेखन अशा विविध भूमिकांमध्ये आपल्या निर्मितीची दृष्टी दाखवलीये. सह-निर्माती योजना पाटील आणि कार्यकारी निर्माता मिलिंद देसाई यांनी त्यांना साथ दिली आहे. प्रवीण यादव (सिनेमॅटोग्राफर), केवल शाह (संपादक), रवी (संगीत आणि पार्श्वसंगीत) आणि अरुण कुमार (वेशभूषा) यांनी चित्रपटात गोव्यातील चित्र उभेहूब जिवंत केलं आहे.

'ठग्स ऑफ गोवा' हा चित्रपटात स्थानिक राजकारण, विश्वासघात आणि फसवणुक अशा गोष्टींमध्ये ओवण्यात आलाय.साई पाटील यांचे दिग्दर्शन, रवीचे संगीत आणि कलाकारांच्या दमदार अभिनय असलेला या चित्रपट ३० मे २०२५ पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT