Sao Joao  Dainik Gomantak
गोवा

Sao Joao Festival: बाणावलीतील वेस्टर्न बायपासचा 'सांजाव'मधून निषेध; ग्रामस्थ म्हणतात, ... अन्यथा बाणावली बुडणे अटळ

युनायटेड बॉयज ऑफ बाणावली या संघटनेच्‍यावतीने हा अनाेखा निषेध कार्यक्रम आयोजित केला होता

गोमन्तक डिजिटल टीम

Sao Joao Festival बाणावली भागातून जाणारा वेस्‍टर्न बायपास हा बगल रस्‍ता मातीचा भराव टाकून न उभारता तो स्‍टील्‍टवर उभारण्‍यात यावा, अशी मागणी करणाऱ्या बाणावलीच्‍या लोकांनी शनिवारी (ता.24) सांजावचे निमित्त साधून पेडा-बाणावली येथे प्रतिकात्‍मक निषेध व्‍यक्‍त केला.

यावेळी या भागातील लोकांनी एक बोट तयार करून आणली होती. जर हा रस्‍ता मातीचा भराव घालून बांधून काढल्‍यास या भागात पावसात पूर हा अटळ आहे.

आणि तशी परिस्‍थिती उद्‍भवल्‍यास लोकांना या बाेटीचा स्‍वत:चा जीव वाचविण्‍यासाठी वापर करावा लागेल, असे यावेळी सांगण्‍यात आले.

युनायटेड बॉयज ऑफ बाणावली या संघटनेच्‍यावतीने हा अनाेखा निषेध कार्यक्रम आयोजित केला होता. यात लहान मुलांनीही भाग घेतला होता.

यावेळी जी बोट तयार करून आणली होती त्‍याच्‍या शिडावर मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना उद्देशून एक संदेश देण्‍यात आला होता. ‘बाणावलीला वाचवायचे असेल तर हा रस्ता स्‍टील्‍टवर बांधा’ असे त्‍यावर लिहिले होते.

हा रस्‍ता स्‍टील्‍टवर बांधला नाही तर पावसात आमच्‍यावर बुडून मरण्‍याची वेळ येऊ शकते. मात्र, आमचे मुख्‍यमंत्री ही वेळ आमच्‍यावर येऊ देणार नाहीत, याची आम्‍हाला खात्री आहे.

हा रस्‍ता स्‍टील्‍टवर बांधण्‍यासाठी मुख्‍यमंत्र्यांनी प्रयत्‍न करावेत, अशी आमची मागणी आहे.

- पेले फर्नांडिस, मच्‍छीमार नेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पर्यटकांच्या फटाक्यांमुळे मच्छिमाराचे 'रापण' खाक; मोठ्या आर्थिक नुकसानानंतर भरपाईची मागणी!

Goa Crime: कळंगुट हादरलं! 15 वर्षांपासून काम करणाऱ्या केअरटेकरची फावड्याने वार करुन निर्घुण हत्या; संशयित पोलिसांच्या ताब्यात

6 वर्षांच्या रमाने 50 सेकंदात पूर्ण केले 8 श्लोक; गोव्याची चिमुकली बनली 'ग्रँडमास्टर'! 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नाव

बेबी एबी अन् रदरफोर्डचं तूफान! सलग 6 चेंडूंवर ठोकले 6 षटकार, मुंबई इंडियन्सची उडवली दाणादाण; 11 वेळा चेंडू गेला मैदानाबाहेर VIDEO

Vijay Hazare Trophy: मुंबईचा विजयी चौकार; गोवा संघाचा 87 धावांनी पराभव, अभिनव तेजराणाची शतकी खेळी व्यर्थ

SCROLL FOR NEXT