child dies after touching live electric wire Dainik Gomantak
गोवा

खेळता-खेळता काळाने घातला घाला! मांगोरहिल येथे तीन वर्षीय बालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

three year old child dies: घरासमोरच्या शेडमध्ये खेळताना जीवंत वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने मांगोरहिल येथील अंकुश शिवकुमार यादव या तीन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: घरासमोरच्या शेडमध्ये खेळताना जीवंत वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने मांगोरहिल येथील अंकुश शिवकुमार यादव या तीन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांगोरहिल-शांतीनगर मार्गावरील एका ठिकाणी राहणारे शिवकुमार यादव यांनी दोन- तीन दिवसांपूर्वी आपल्या घरासमोर नवीन लोखंडी शेड उभारली होती.

या शेडखाली त्यांचा तीन वर्षीय मुलगा अंकुश हा शुक्रवारी (ता. १९) दुपारी खेळत होता. खेळता खेळता त्याचा तेथे लोंबकळत असलेल्या जीवंत वीजवाहिनीला स्पर्श झाला. त्यामुळे त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. विजेच्या धक्क्यामुळे अंकुश तेथेच निपचित पडला. त्यामुळे घरच्या मंडळींनी त्याला त्वरित उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात नेले.

मात्र, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेला. तेथील कायदेशीर सोपस्कारानंतर पार्थिव नातेवाईकांकडे सोपविण्यात आले. याप्रकरणी वास्को पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक निखिल देसाई पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT