Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Quepem Theft: केरळमध्ये जामिनावर सुटल्या, गोव्यात येऊन चोरी केली; 'त्या' 3 महिलांनी केपेपूर्वी मडगाव, कुडचडेत केली रेकी

Quepem Jewellery Shop Theft: या प्रकरणाचा तपास करताना केपे पोलिसांनी पुण्‍यात जाऊन जया बडगुजर या महिलेला अटक करून तिच्‍याकडून चोरीचे दागिने जप्‍त केले होते.

Sameer Panditrao

मडगाव: केपेतील भवानी गोल्‍ड या सराफी दुकानातील ३.७८ लाखांच्‍या सोन्‍याच्‍या दागिन्‍यांची चोरी करणाऱ्या तीन महिलांनी आधी मडगाव आणि कुडचडे या दोन ठिकाणी जाऊन रेकी केली हाेती. मात्र, या दोन्‍ही ठिकाणी लाेकांची गर्दी जास्‍त असल्‍याचे लक्षात आल्‍यावर त्‍यांनी केपेच्‍या बाजूने मोर्चा वळविला. ज्‍या भवानी गोल्‍ड दुकानात ही चोरी झाली, त्‍या ठिकाणी लोकांची फारशी वर्दळ नसते. त्‍यामुळे या चोरांनी हेच दुकान चोरी करण्‍यासाठी निवडले.

२२ मार्च रोजी ही चोरी झाली हाेती. लहान मुलांचे दागिने खरेदी करण्‍याच्‍या बहाण्‍याने या तिन्‍ही महिला दुकानात शिरल्‍या. त्‍यांनी दुकानदार महिलेचे लक्ष विचलीत करून एक सोनसाखळी, एक कंठहार आणि दोन सोन्‍याच्‍या अंगठ्या चोरून नेल्या. या प्रकरणाचा तपास करताना केपे पोलिसांनी पुण्‍यात जाऊन जया बडगुजर या महिलेला अटक करून तिच्‍याकडून चोरीचे दागिने जप्‍त केले होते.

आतापर्यंत या तिन्‍ही महिलांवर दोन ठिकाणी गुन्‍हे नाेंद झाले आहेत. त्‍यांनी आणखी कुठे गुन्‍हे केले आहेत का, याचाही तपास केपेचे पोलिस करीत आहेत.

Crime theft

यापूर्वी केरळ राज्‍यातील कलमासरी पोलिस स्‍थानकाच्‍या हद्दीत त्‍यांनी अशाच प्रकारे चोरीचा प्रयत्‍न केला होता. त्‍यावेळी स्‍थानिकांनी त्‍यांना रंगेहात पकडून पोलिसांकडे दिले होते. त्‍या प्रकरणातही त्‍या जामीनमुक्‍त झाल्‍या होत्‍या.

त्‍यानंतर त्‍यांनी गोव्‍यात येऊन हातसफाई केली. गोव्‍यात फारशी गर्दी नसल्‍यामुळे अशा चोऱ्या करणे सोपे आहे, अशी टीप त्‍यांना महाराष्‍ट्रातील एका इसमाकडून मिळाली होती. त्‍यामुळे या महिला गोव्‍यात आल्‍या होत्‍या, अशी माहिती प्राप्‍त झाली आहे. केपेचे पोलिस उपनिरीक्षक दिगंबर बोंद्रे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

१० हजारांचा जामीन

आज जया बडगुजर या संशयित महिलेला पोलिसांनी केपे न्‍यायालयात हजर केले असता, या महिलेकडून चोरीचा ऐवज पोलिसांनी जप्‍त केल्‍यामुळे तिला पोलिस कोठडीत ठेवण्‍याची गरज राहिलेली नाही. हा मुद्दा मान्‍य करीत तिला दहा हजार रुपयांच्‍या जामिनावर मुक्‍त केले.

पुण्याच्या पोलिसांची असेल नजर

संशयित महिलेने दर महिन्‍याला तीनवेळा केपे पोलिस ठाण्यात हजेरी द्यावी, अशी अट न्‍यायालयाने घातली आहे, तसेच ही महिला ज्‍या ठिकाणी वास्‍तव्य करून आहे, त्‍या पुणे परिसरातील पाच पोलिस स्‍थानकांना ही महिला देशाबाहेर जात असेल तर तिच्‍यावर लक्ष ठेवावे, अशी सूचना केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA: दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव! ऑस्ट्रेलियाने मोडला भारताचा कीर्तिमान; हेड, मार्श अन् कॅमेरुनची वादळी शतके

Congress MLA Arrested: 12 कोटी कॅश, 6 कोटींचं सोनं... मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस आमदाराला अटक, ईडीची कारवाई

Rahul Gandhi Video: काय चाललंय? राहुल गांधींना Kiss करुन तरुण पळाला, सुरक्षा रक्षकानं लगावली कानशिलात; व्हिडिओ व्हायरल

Sourav Ganguly Head Coach: 'दादा' इन अ न्यू रोल! सौरव गांगुली बनला मुख्य प्रशिक्षक, 'या' संघाची जबाबदारी स्वीकारली

मातीची मूर्ती बनवा, 200 रुपये मिळवा! गोवा सरकारची अनोखी योजना; वाचा माहिती

SCROLL FOR NEXT