Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पत्रकार अमित नाईक हल्याप्रकरणी तीन संशयितांना अटक; केपे पोलिसांची कारवाई

Goa Police: पत्रकार अमित नाईक आणि सहकाऱ्यांवर काही अज्ञातांकडून नेत्रावळीत हल्ला करण्यात आला होता, या संदर्भात आता केपे पोलिसांना तीन संशयीतांच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे.

Akshata Chhatre

Sanguem,Goa

सांगे: पत्रकार अमित नाईक आणि सहकाऱ्यांवर काही अज्ञातांकडून नेत्रावळीत हल्ला करण्यात आला होता. या संदर्भात आता केपे पोलिसांना तीन संशयीतांच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे.

पोलिसांनी निटो फ्रान्सिस फर्नांडिस (वास्को), मंदार श्रीधर प्रभू (फोंडा) आणि डेव्हिड जोकिम दिनीझ (फोंडा) अशा तिघांना मंगळवारी (२९ ऑक्टोबर) रोजी अटक केली. तसेच, या प्रकरणात आणखी काही संशयितांना अटक केली जावू शकते अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, आरोपींनी हा हल्ला का घडवून आणला? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. या तिन्ही संशयितांचे पत्रकार अमित नाईक यांच्यासोबत वैयक्तिक वैर नव्हते. नाईक आपल्या 'We For Sanguem' या युट्युब चॅनलच्या माध्यमातून राज्यातील ज्वलंत प्रश्नावर परखड भाष्य करायचे. म्हणून तर त्यांची हत्या करण्यात आली नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कधी झाला हल्ला?

14 सप्टेंबर रोजी पत्रकार अमित त्यांच्या गाडीने घरी परतत असताना निळ्या रंगाच्या व्हेन्यू कारने त्यांना रस्त्यात अडवले होते. दरम्यान, रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासात पोलिसांनी सदर प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला.

तपास अधिकाऱ्यांना निळ्या रंगाची व्हेन्यू कार फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत होती. त्यांनतर पोलिसांनी तपासादरम्यान राज्यातील सर्व निळ्या रंगाच्या ह्युंदाई कारचे रेकॉर्ड तपासले, ज्यामुळे पोलिसांना आरोपींपर्यंत अगदी सहजपणे पोहोचता आले. पोलिसांना या गाडीचा देखील पत्ता सापडला असून लवकरच पोलीस ही गाडी देखील ताब्यात घेतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

Surya Gochar 2026: नोकरदारांना प्रमोशन अन् व्यापाऱ्यांना बंपर नफा! सूर्याचं नक्षत्रांतर 5 राशींसाठी ठरणार लकी; काठोकाठ भरणार तिजोरी

SCROLL FOR NEXT