Colva Beach Sisters Fight Canva
गोवा

Goa Crime: कोलवा बीचवर तीन बहिणींची फ्री-स्टाईल मारामारी; झिंज्या उपटल्या, पोलिसांनाही धक्काबुक्की

Colva Beach Sisters Fight: या महिला इतक्या आक्रमक झाल्या होत्या की, त्यांना ताब्यात घेण्यासाठी पिंक फोर्सच्या महिला पोलिस तिथे आल्या असता, त्यांनाही धक्काबुक्की केली.

Sameer Panditrao

Domestic Dispute Leads to Fight Among Sisters on Colva Beach

मडगाव : घरगुती वादातून एका बहिणीने दुसऱ्या बहिणीच्या झिंज्या उपटण्यास सुरुवात केली. या भांडणात तिसऱ्या बहिणीनेही भाग घेतल्याने आज दुपारी कोलवा समुद्र किनाऱ्यावर लोकांच्या गर्दीत चक्क ‘फ्री स्टाईल’ मारामारी सुरू झाली. ही मारामारी सोडविण्यास गेलेल्या लोकांनाही शिवीगाळीला सामोरे जावे लागले.

एवढेच नव्हे, तर कोलवा किनारी तिघा या बहिणींना ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पिंक फोर्सच्या महिला पोलिसांनाही या भगिनींनी धक्काबुक्की केली. या तीन बहिणींची नावे मधू पाटील, जान्हवी साबळे आणि निलम पाटील अशी असून सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. कोलवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही बहिणी मूळच्या बेळगाव येथील असून सध्या त्या कामानिमित्त रावणफोंड येथे भाड्याच्या घरात राहतात.

आज त्या कोलवा समुद्र किनाऱ्यावर भटकंतीसाठी आल्या असता त्यांच्यात वाद सुरू झाला. शब्दाला शब्द वाढत हे भांडण भडकल्याने त्यांनी एकमेकींच्या झिंज्या उपटण्यास सुरुवात केली. हे भांडण हाताबाहेर जाते, हे पाहिल्यावर काही लोकांनी मध्ये पडून ते थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी लोकांनाही शिवीगाळ केल्याने लोकांनी पोलिसांना बोलावले.

या महिला इतक्या आक्रमक झाल्या होत्या की, त्यांना ताब्यात घेण्यासाठी पिंक फोर्सच्या महिला पोलिस तिथे आल्या असता, त्यांनाही धक्काबुक्की केली. शेवटी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. सध्या त्या तिघी पोलिस कोठडीची हवा खात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT