Goa Assault Case Dainik Gomantak
गोवा

Pernem: मोरजीत परप्रांतीय भिडले; दिल्लीच्या एकाला गंभीर मारहण, UP, उत्तराखंडचे तिघे ताब्यात

Pernem Assault Case: तिघा संशयितांनी दिल्लीच्या चेतन यादव याच्यावर हल्ला करुन मारहाण केली.

Pramod Yadav

पेडणे: मोरजीत परप्रांतीय नागरिकांमध्ये वादातून हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यात दिल्लीच्या एका व्यक्तीला गंभीर मारहाण करणाऱ्या उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या तिघांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी दीड वाजता ही घटना घडली.

भरत सिंग सौद (३८), योगेश सिंग (२४) (दोघेही रा. उत्तराखंड) आणि सचिन पांडे (२७, रा. उत्तर प्रदेश) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित तिघांची नावे आहेत.

याप्रकरणी चेतन यादव (रा. पितमपुरा, दिल्ली) यांनी पेडणे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघा संशयितांनी दिल्लीच्या चेतन यादव याच्यावर हल्ला करुन मारहाण केली. तिघांनी यादव यांना लाथाबुक्क्यांनी तसेच जड वस्तूंच्या मदतीने मारहाण करुन जखमी केले.

संशयितांनी त्याच्याकडून सोन्याची चैन आणि चांदीचे ब्रेसलेट देखील चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohammed Siraj Record: सिराजने मोडला बुमराहचा विक्रम! 29 वर्षांनंतर 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला आशियाई खेळाडू

Goa News Live Update: आग्वाद येथे दोघांवर चाकू आणि कात्रीने हल्ला; तामिळनाडूच्या पाच जणांना अटक

Goa Politics: खरी कुजबुज; धीरयोमागे स्वार्थ?

"मानकुरादची नवी कलमे लावा, उत्‍पन्न वाढवा", CM सावंतांचं शेतकऱ्यांना आवाहन; प्रतिहेक्‍टर मिळतंय 2 लाख रुपयांचे अनुदान

Goa Assembly: 'किनारी भागात भटकी कुत्री, जनावरांवर निर्बंध आणा', जीत आरोलकरांची मागणी

SCROLL FOR NEXT