Rangita Enterprises scam Dainik Gomantak
गोवा

रंगीता एंटरप्राइजेस घोटाळ्यात तीन कर्मचाऱ्यांना अटक

गुंतवणूकदाराना लावला 9.33 कोटींचा चुना

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यातील सुमारे अडीज हजार गुंतवणूकदाराना तब्बल 9.33 कोटींचा चुना लावणाऱ्या रंगीता एंटरप्राइजेस घोटाळ्यात काल आर्थिक गुन्हेगारी विभाग पोलिसांनी स्वीजल फेर्नांडिस, लिंबाजी लमाणी व मुईद मधवाणी या तीन कर्मचाऱ्यांना अटक केली. ( Three employees arrested in Rangita Enterprises scam 9.33 crore cheated )

आज या तिन्ही संशयितांना दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांच्यासमोर हजर केले असता त्यांना आठ दिवस पोलीस कोठडीत ठेऊन चौकशी करण्याचा आदेश दिला. या प्रकरणी मुख्य आरोपी जयकुमार गोहिल याला गोवा पोलिसांनी मागच्या आठवड्यात गुजरात येथून अटक करून आणले होते.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की केलेल्या गुंतवणूकीवर 50 टक्के परतावा महिना अखेर देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून घेतली. सुरवातीला लोकांना असा परतावाही देण्यात आला. त्यामुळे लोकांचा विश्वास बसून ते जास्तीत जास्त गुंतवणूक करू लागले. वरील तिन्ही संशयित गोहिल याचे एजंट होते.

मात्र नंतर एक दिवस गोहीलने मडगाव येथील आपल्या कार्यालयाला टाळे ठोकून पळ काढला त्यावेळी या तिघांही जणांनी मडगाव पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता. गोहिल याला अटक केल्यावर ज्यांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही आरोपी करण्यात आले.

आज जेव्हा हे प्रकरण रिमांडसाठी आले असता संशयितांचे वकील ऍड. अमेय प्रभुदेसाई यांनी आपल्या आशिलानीच सुरवातीला पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता आणि आतापर्यंत त्यांनी पोलिसांना तपासात सहकार्य केले आहे याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT