Mahadayi River | Kalasa Banduri Project Karnataka Dainik Gomantak
गोवा

Kalasa Banduri: पुन्हा कर्नाटकची कुरघोडी! ‘कळसा-भांडुरा’जवळ तीन बांधकामांसाठी निविदा

Mhadei River Water Dispute: कळसा-भांडुरा योजनेचे काम सुरू केले नसल्याचा दावा कर्नाटक शासनाकडून केला जात असला तरी या प्रकल्पाजवळील चिक्कहट्टीहोळी येथे समाज भवन तसेच रयत भवन आणि कणकुंबी येथे विश्रामधाम बांधण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

बेळगाव: कळसा-भांडुरा योजनेचे काम सुरू केले नसल्याचा दावा कर्नाटक शासनाकडून केला जात असला तरी या प्रकल्पाजवळील चिक्कहट्टीहोळी येथे समाज भवन तसेच रयत भवन आणि कणकुंबी येथे विश्रामधाम बांधण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

या तिन्ही बांधकामांसाठी सर्वेक्षण, अंदाजपत्रक, नकाशे व आराखडा तयार करण्याच्या कामाचा ठेका कर्नाटक (Karnataka) पाटबंधारे विभागाच्या खानापूर येथील कळसा प्रकल्प विभागातर्फे दिला जाणार आहे. या कामाचा ठेका देण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून निविदा काढली आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत निविदा मागविल्या आहेत. खानापूर येथील कळसा प्रकल्प विभागाने ९ ऑक्टोबर रोजी ही निविदा प्रसिद्ध केली आहे.

गोवा सरकार आपल्या भूमिकेवर ठाम

गोवा सरकारने कळसा-भांडुरा प्रकल्पावरील आक्षेप मागे घेतल्यास तम्नार-गोवा या उच्चदाबाच्या वीजवाहिनी प्रकल्पासाठी कर्नाटककडून ना-हरकत दिली जाईल, असा प्रस्तावही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मांडला आहे. पण कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या विरोधातील भूमिका गोवा राज्याने कायम ठेवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT