kundaim Crime News Dainik Gomantak
गोवा

कुंडईतील चोरी प्रकरणी तिघांना अटक

दोन लाख रुपये किमतीची तांब्याची वायर पोलिसांनी केली हस्तगत

दैनिक गोमन्तक

फोंडा: कुंडई औद्योगिक वसाहतीतील डिनोरा या आस्थापनात झालेल्या चोरीप्रकरणी फोंडा पोलिसांनी एका वाहनासह तिघांना पकडले आहे. संशयित चोरट्यांकडून चोरलेला मालही हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई काल दिनांक 8 ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे. (Three arrested in case of copper theft of two lakh rupees in kundaim, ponda)

डिनोरा या आस्थापनात 3 ते 5 तारखे दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपये किमतीची तांब्याची वायर चोरीला गेली होती. याची तक्रार आस्थापना अधिकारी अनुराधा कदम यांनी केली होती. या तक्रारीला अनुसरून फोंडा पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत तपास सुरू केला असता, चोरीसाठी वापरण्यात आलेला छोटा टेंपो करासवाडा म्हापसा येथे आढळला.

फोंडा पोलिसांनी आढळलेल्या टेंपोचा चालक महंमद मुस्तफा महंमद सिद्धीकी (वय 35) मूळ उत्तर प्रदेश येथील पण सध्या मुशीरवाडो - कोलवाळ येथे राहणाऱ्याला व कर्नाटकातील अन्य दोन महिलांना अटक केली. या दोन्ही महिला मूळ कर्नाटक येथील असून त्या सध्या करासवाडा येथे राहतात.

पोलिसांनी चोरीचा माल हस्तगत केला असून कारवाई पोलिस उपअधीक्षक सी. एल. पाटील व फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य वेळीप, हेडकॉन्स्टेबल केदारनाथ जल्मी, हनुमंत बोरकर, कॉन्स्टेबल अमेय गोसावी व इतरांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT