Colvale Jail Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: तुरुंगातील कैद्यांना नशेचे पदार्थ पाठविण्यासाठी लढवली अनोखी शक्कल; गांजाचे गोळे फेकणाऱ्या तिघांना अटक

Goa Crime News: एकूण सात गांजाचे बॉल आकाराचे गोळे तयार करून ते आतमध्ये कंपाऊंड वॉलवरून फेकले होते; एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याची रवानगी 'अपना घर'मध्ये केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात अंमलीपदार्थाची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी तिघांना अटक केली. तर, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याची रवानगी 'अपना घर'मध्ये केली.

संशयितांनी गांजाची बॉलच्या आकाराचे एकूण सात गोळे बनवून ते कारागृहाच्या आवाराच्या दिशेने फेकले होते. हा मुद्देमाल १.३९७ किलो ग्रॅमचा आहे. सदर घटना १४ जून रोजी उघडकीस आली होती.

या प्रकरणी कारागृहाच्या उपअधीक्षकांनी पोलिस तक्रार देताच, कोलवाळ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेत गौमत तलवार (२४), सॅम्युअल पुजारी (२४, दोघेही रा. अन्साभाट, म्हापसा) व जाफर मुल्ला (२४, खोर्ली, म्हापसा) यांचा समावेश आहे. त्यांना नंतर रितसर अटक करण्यात आली.

दरम्यान, घटनेला इतके दिवस उलटूनही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेची वाच्यता न केल्याने, पोलिसांच्या एकंदर हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. उपलब्ध माहितीनुसार, संशयितांनी सायंकाळच्या वेळी काळोखाचा फायदा घेत, कारागृहात हे गांजाचे गोळे फेकले. एकूण सात गांजाचे बॉल आकाराचे गोळे तयार करून ते आतमध्ये कंपाऊंड वॉलवरून फेकले होते.

एकूण फेकले सात गोळे

या संशयितांनी गांजाचे गोलाकार सात गोळे बनवून ते कारागृहाच्या आवारात फेकले होते. या गांजाची किंमत १ लाख ४० हजार रुपये असून, तो १.३७९ किलो ग्रॅम आहे. या संशयितांपैकी चौथा संशयित हा अल्पवयीन आहे. सर्व संशयित हे म्हापसा शहरातील असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे पोलिसांनी तिघांना अटक केली.

'त्या' संशयितांसाठी पुरवठा!

१) ज्या संशयितांनी मोठे धाडस करून हे गांजाचे गोलाकार सात गोळे बनवून ते कारागृहात फेकले होते, ते मुळात कारागृहातील काही कैद्यांना पुरवठा करण्याच्या हेतूनेच.

२) अलिकडेच म्हापशात एका गाजलेल्या खूनप्रकरणातील काही संशयित या कारागृहात आहेत. गांजाची गोळाफेक करणारे व कारागृहात असलेले कैदी हे एकमेकांचे ओळखीचे असल्याने हा पुरवठा त्यांच्यासाठी होता, असे सूत्रांनी सांगितले.

३) संशयितांनी गांजाचे सात गोलाकाराचे गोळे करून ते आवारात फेकले होते. हे गोळे १४ जून रोजी सकाळी सव्वादहाच्या सुमारास ड्युटीवरील कॉन्स्टेबल प्रशांत नाईक त्यांच्या निदर्शनास आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: जमीन हडप प्रकरणात ED ची मोठी कारवाई; संदिप वझरकर यांच्यासह संबंधितांवर धाड

SCROLL FOR NEXT