Cyber crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Aseembly: सायबर गुन्ह्यांतील साडेतीन कोटी जप्त; २९८ प्रकरणे नोंद

Pramod Sawant On Cybre Crime: विभागासह लॅब अधिक सक्षम, सायबर गुन्ह्यांसंदर्भात नागरिकांतही जागृती सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात सायबर गुन्हे कक्षाकडे गेल्या साडेचार वर्षांत २९८ प्रकरणे नोंद झालेली आहेत. त्यातील काही प्रकरणांचा तपास करत विभागाने आतापर्यंत गोमंतकीयांचे अडकलेले साडेतीन कोटी रुपये गोठवून जप्त केले आहेत. या विभागासह त्याची लॅब अधिक सक्षम करण्यात आली आहे. तसेच सायबर गुन्ह्यांसंदर्भात नागरिकांतही जागृती सुरू आहे, अशी माहिती गृहमंत्री या नात्‍याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्‍या तासाला दिली.

राज्यात मोठ्या प्रमाणात सायबर गुन्‍ह्यांची प्रकरणे घडत आहेत. मात्र त्यांचा तपास लागण्यास विलंब होत आहे किंवा तपास लागतच नाही. घडलेल्या गुन्ह्यांची माहिती विभागाच्या संकेतस्थळावर देऊन त्‍याबाबत नागरिकांमध्ये जागृती करावी, जेणेकरून अशा गुन्ह्यांना ते बळी पडणार नाहीत, असे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्‍स यांनी सांगितले.

सायबर गुन्हे विभाग सक्षम करण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत? सायबर गुन्हे तक्रारी रायबंदर येथे येऊन सायबर गुन्हे विभागाकडे देण्याची सक्ती आहे की तेथील पोलिस स्थानकांतही त्या देता येतात? असे प्रश्‍न आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्‍स यांनी उपस्‍थित केले होते. या प्रकरणांचा तपास करण्यास उशीर का लागतो? असा प्रश्‍न आमदार नीलेश काब्राल यांनी विचारला.

त्‍यावर मुख्‍यमंत्री सावंत म्‍हणाले, लोकांना बोगस कॉल्स येऊ लागले आहेत. काहीजण या कॉल्सवरून दिलेल्या माहितीमुळे घाबरून जाऊन बळी पडतात. वेगवेगळ्या पद्धतीने सायबर गुन्हेगार लोकांना अडकवून पैसे लुटत आहेत. ही प्रकरणे हाताळण्यासाठी राज्यात १९८० साली सायबर गुन्हे विभाग स्थापन केला गेला.

म्‍हणून होतो तपासाला विलंब!

सायबर गुन्हे विभागात नवसंकल्पना अवलंबण्यात येत आहेत. अनेकदा तक्रारदाराकडूनच तक्रार देण्यास उशीर होतो. त्यामुळे काहीवेळा तपासाला विलंब होतो. सायबर गुन्हे कक्षाव्यतिरिक्त स्थानिक पोलिस स्थानकातही तक्रार देता येते. त्यानंतर ती विभागाकडे वर्ग केली जाते, असे मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Consumer Commission: मुदतवाढ नाकारल्याने दक्षिण गोवा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कोर्टात! 'अन्याय’ झाल्याचा केला दावा

Teachers Pending Salary: 458 शिक्षक-कर्मचाऱ्यांचा थकीत पगार कधी मिळणार? सरदेसाईंचं मुख्य सचिवांना पत्र; तात्काळ वेतनाची केली मागणी

Curchorem Drug Capital Goa: कुडचडे गोव्याचं 'ड्रग कॅपिटल'? अमित पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल; अमली पदार्थांविरोधात निर्णायक कारवाईची केली मागणी

Viral Video: भरधाव राजधानी एक्सप्रेस अन् समोर हत्तींचा कळप! देवदूत बनून आला वन रक्षक; थोडक्यात काळाचा घाला टळला

ISRO Space Sector Reforms: 'इस्रो'चं खासगीकरण नाही, तर जबाबदारीचं नव्यानं वाटप! 2020 नंतर स्पेस इकॉनॉमीला वेग; नव्या अवकाश धोरणानं बदलली भारताची दिशा

SCROLL FOR NEXT