Suleman Khan Video Viral Dainik Gomantak
गोवा

Suleman Khan: 'माझा Encounter करण्याची धमकी, पोलिसांनीच सोडले हुबळीत, 12 जणांचा सहभाग'; फरार सुलेमानचा पहिला Video Viral

Suleman Khan Video Viral: मला १२ नोव्हेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आली तेव्हांपासूनची सीसीटीव्ही फुटेज काढली तर सर्वप्रकार उघडकीस येईल, असे सिद्दीकी व्हिडिओत म्हणत आहे.

Pramod Yadav

Suleman Khan Video Viral

पणजी: 'माझा एन्काउंटर करण्याची धमकी दिली. गुन्हे शाखेच्या कोठडीत मला जबर मारहाण केली. तसेच, माझ्या घराची मोडतोड केली. शिवाय मला हुबळीला पोलिसांनीच आणून सोडले', असा खळबळजनक खुलासा कोठडीतून फरार झालेल्या जमीन हडप प्रकरणाचा मास्टरमाईंड सुलेमान खान याने केला. सुलेमान खान याने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, यात त्याने गोवा पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. तसेच, प्रकरणाची सीबीआय चौकशी करत असल्यास शरण येण्याची तयारी बोलून दाखवली.

सुलेमान खान याचा हा व्हिडिओ सुनिल कंवठणकर यांनी प्रसिद्ध केला आहे. "एसआयटीचे काही पोलिस, आयआरबीचे कॉन्स्टेबल आणि राहुल गुप्ता व सुरज अलंकार यांनी मला गुन्हे शाखेच्या कार्यालयात जबर मारहाण केली. तसेच, माझा एन्काउंटर करण्याची धमकी दिली. माझ्या घराची देखील मोडतोड केली. मला १२ नोव्हेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आली तेव्हांपासूनची सीसीटीव्ही फुटेज काढली तर सर्वप्रकार उघडकीस येईल", असे सिद्दीकी उर्फ सुलेमान व्हिडिओत म्हणत आहे.

"या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देणार असल्यास मी पोलिसांना शरण येण्यास तयार आहे. मी फरार झालो असे म्हणतात पण मी पळालो नाही, पोलिसांनीच मला हुबळीत सोडले. यात बारा लोकांची टीम आहे. आणि माझी स्थिती फार गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी, अशी मागणी सिद्दीकीने व्हिडिओतून केलीय. गोयंकार आणि मिडियाने देखील यासाठी दबाव निर्माण करावा", असे सिद्दीकी व्हिडिओत बोलताना दिसत आहे.

सिद्दीकी उर्फ सुलेमानने व्हिडिओत एका आमदाराचे देखील नाव घेतल्याने आता हे प्रकरणाने वेगळे वळण घेतल्याचे दिसत आहे. दरम्यान, गोव्याचे पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी सुलेमानचा हा व्हिडिओ म्हणजे पोलिसांचा शोध चुकवण्याचा एक डावपेच असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

NSA In Goa : गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

SCROLL FOR NEXT