गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) विधानसभेचा प्रचार करण्यासाठी गुजरातमध्ये आहेत. प्रचारादरम्यान, डॉ. सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सावंत यांनी राहूल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका करताना 'भारत जोडो'च्या बाता करणाऱ्यांनी पूर्वी गोवा भारताशी जोडण्यास विलंब केला अशी खोचक टीका केली.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुजरातमधील वेजालपूर आणि मनीनगर भागात भाजप उमेदवार अमुल भटट् आणि अमित ठाकर यांच्यासाठी प्रचार केला. त्यानंतर थलतेज येथील प्रत्रकार परिषदेला सावंत यांनी संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई (MLA Vijay Sardesai) राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. त्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारण्यात आला. "आज जे भारत जोडो यात्रेला प्रोत्साहन देत आहेत, त्यांनी गोवा भारताशी जोडायला विलंब केला." अशा शब्दात सावंत यांनी विजय सरदेसाई यांच्यासह भारत जोडो यात्रेवर टीका केली.
इफ्फीचा वाद
इफ्फीच्या (Iffi) समारोप कार्यक्रमात काश्मीर फाईल्स बाबत इस्त्रालयचे दिग्दर्शक नदाव लॅपिड यांनी केलेल्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना प्रश्न विचारण्यात आला.
"इस्त्रालयचे दिग्दर्शक नदाव लॅपिड यांनी काश्मीर फाईल्स बाबत केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो. इफ्फीच्या व्यासपीठाचा त्यांनी गैरवापर केला आहे. एनएफडीसी आणि ईएसजी त्यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेणार आहेत." असे उत्तर डॉ. सावंत यांनी दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.