Goa Theft Dainik Gomantak
गोवा

Thivim Theft: नातीच्या मित्राने फसवलं! घरातून पळवले १.८५ कोटी; थिवीतील धक्कादायक घटना, एकास अटक

Goa Theft: थिवी येथे घरफोडी करून १ कोटी ८५ लाख रूपये रोख चोरल्याच्या आरोपाखाली कोलवाळ पोलिसांनी कबीर प्रधान (रा. बागा-कळंगुट) यास अटक केली आहे. चोरीचे हे प्रकरण सोमवारी (ता.१) उघडकीस आले.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: थिवी येथे घरफोडी करून १ कोटी ८५ लाख रूपये रोख चोरल्याच्या आरोपाखाली कोलवाळ पोलिसांनी कबीर प्रधान (रा. बागा-कळंगुट) यास अटक केली आहे. चोरीचे हे प्रकरण सोमवारी (ता.१) उघडकीस आले.

घरात ठेवलेली १ कोटी ८५ लाख रूपयांची रोकड चोरीस गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फिर्यादी चंद्रकांत गाड यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली असून चौकशीवेळी ही चोरी तक्रारदाराच्या नातीच्या एका मित्राने केल्याचे आढळून आले.

संशयित आरोपी हा फिर्यादीच्या नातीसोबत अधून मधून घरी येत होता. त्याला घरात मोठी रक्कम असल्याची माहिती होती. संशयिताने एका मित्राच्या साहाय्याने ही चोरी केली. फिर्यादी कुटुंबीय घराबाहेर असल्याची संधी साधून संशयिताने या बंद घरात प्रवेश केला आणि घरातील सर्व रक्कम चोरून नेली.

दरम्यान, तक्रार दाखल होताच पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयिताकडून चोरीतील ७ लाख रूपये रक्कम जप्त केले आहेत.

चोरीची रक्कम गुंतवली विविध ठिकाणी

संशयिताने चोरीतील रक्कम काही ठिकाणी गुंतवली असून तेही जप्त करण्याची प्रक्रीया पोलिसांनी चालवली आहे. याप्रकरणात संशयिताचा एक साथीदार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT