गोवा

असा असणार आज दिदींचा गोवा दौऱ्याचा टाइम टेबल

ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या भेटीवर गोव्यात आल्या, तेव्हा राजशिष्टाचार खात्याने जरी त्यांना पुष्पगुच्छ दिला असला, तरी पुढचे काही दिवस आक्रमक रणनीती, डावपेच किंवा हिंसक राजकारणाला त्यांना तोंड द्यावे लागणार

दैनिक गोमन्तक

पणजी: सत्ताधारी भाजपला शिंगावर घेण्याच्या इराद्याने आज गोव्यात (Goa) अवतरलेल्या पश्चिम बंगालच्या (West Bengal) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना भाजपची नारेबाजी, काळे झेंडे आणि त्यांच्या चेहऱ्याचे विद्रुपीकरण केलेल्या जाहिराती न्याहाळत गोव्यात प्रवेश करावा लागला. विमानतळावर हिंदुत्ववाद्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा देऊन त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला व गोव्यात त्यांचा एकही फलक असा सोडला नाही, ज्याचे विद्रुपीकरण केलेले नाही.

ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या भेटीवर गोव्यात आल्या, तेव्हा राजशिष्टाचार खात्याने जरी त्यांना पुष्पगुच्छ दिला असला, तरी पुढचे काही दिवस आक्रमक रणनीती, डावपेच किंवा हिंसक राजकारणाला त्यांना तोंड द्यावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ममतांनी ज्या पद्धतीचे राजकारण पश्चिम बंगालमध्ये छेडले आहे, त्याला प्रत्युत्तर देण्याचा भाजपचा हा आक्रमक पवित्रा आहे. त्यांच्या आगमनामुळे कॉंग्रेस पक्षही सावध झाला आहे. प्रशांत किशोर यांनी काल गोव्यात भाजपच्या समर्थनाचे केलेले प्रयत्नही विरोधकांच्या पसंतीस उतरलेले नाहीत.

राज्यात राजकीय घडामोडींना सुरवात

ममता बॅनर्जी यांच्या तीन दिवसांच्या गोवा भेटीत अनेक घडामोडी घडतील अशी अपेक्षा असून अन्य पक्षातील काही आमदार तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. यामुळे ३० ऑक्टोबरपर्यंत बऱ्याच राजकीय उलथापालथी पाहायला मिळणार आहेत.

भाजपवर परिणाम नाही

प्रत्येकाला लोकशाहीत कोणत्याही राज्यातून निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व माझा भाजप सरकारवर पूर्ण विश्‍वास आहे. त्यामुळे कोणीही गोव्यात येऊन निवडणूक लढविली म्हणून त्याचा परिणाम भाजपवर होणार नाही. त्याचा पक्षाला काहीच फरक पडणार नाही. आगामी विधानसभा भाजपच बहुमताने जिंकेल.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून सत्ताधारी भाजप सरकार पूर्णतः अपयशी ठरला आहे. या पार्श्वभूमीवर ममता दीदींची गोवा भेट यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे. भाजप कार्यकर्त्यांनी यापूर्वी अनेकवेळा दीदीला विरोध केला होता. दीदी ‘स्ट्रेट फायटर’ आहे त्यामुळे याचा काहीच फायदा होणार नाही.

- डेरेक ओब्रायन, तृणमूल काँग्रेस

भेटीगाठी, चर्चा आणि देवदर्शन

ममता बॅनर्जी यांची सकाळी 10 वाजता गोवा तृणमूल नेत्यांसोबत बैठक, 12 वाजता बेती येथील मच्छीमारांसोबत चर्चा, 1 वाजता पत्रकार परिषद, 3.30 वाजता मंगेशी दर्शन, 4 वाजता महालसा नारायणी दर्शन, 430 वाजता तपोभूमी दर्शन, 6 वाजता मान्यवरांच्या भेटी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT