Goa State Industries Assosiation Dainik Gomantak
गोवा

Goa Industries: हा मुर्खपणाचा निर्णय! गोवा सरकार पगारी रजा कशी घोषित करू शकते? गोव्यातील उद्योगांचा सवाल

कर्नाटक निवडणुकीबाबत पगारी रजेच्या घोषणेवरून नाराजी

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa State Industries Assosiation: कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी गोव्यातील कर्नाटकच्या कर्मचाऱ्यांना गोवा सरकारने पगारी रजा घोषित केली आहे. तथापि, या निर्णयावरून गोव्यातील उद्योगांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

राज्य सरकार अशी घोषणा कशी करू शकतात, असा सवाल Goa State Industries Assosiation (GSIA) ने केला आहे. हा निर्णय मुर्खपणाचा आहे. अशा पद्धतीचा निर्णय घेण्याची काही गरज नव्हती. अशा निर्णयाचा काहीही संबंधच येत नव्हता.

राजकीय फायद्यासाठी उद्योगांना दावणीला बांधण्याचा हा प्रकार आहे. प्रत्येक निवडणुकीत हे असेच होत राहिले तर गोव्यात उद्योग करणे अवघड होऊन जाईल.

आम्ही यावर कायदेशीर उपाय काय करता येईल, हे पाहत आहोत. गोवा सरकारचा हा निर्णय एकतर्फी आहे, असे GSIA ने म्हटले आहे. यातून उद्योगांची नाराजीच व्यक्त झाली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 10 मे रोजी मतदान होत आहे. गोव्यात असलेल्या कर्नाटकातील कर्मचाऱ्यांना जे मतदार आहेत, अशांना गोवा सरकारने 10 मे रोजी पगारी सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचा आदेश राज्य सरकारने सोमवारी जारी केला होता.

सरकारने या आदेशात म्हटले आहे की, कर्नाटकातील काही मतदार गोव्यात कामानिमित्त राहत आहेत. अशा गोव्यात असलेल्या कर्नाटकातील मतदार कर्मचाऱ्यांसाठी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी बुधवारी 10 मे रोजी पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

औद्योगिक कामगार, सरकारी विभागातील रोजंदारी कामगार, राज्य सरकारचे औद्योगिक विभाग, गोवा राज्यातील खाजगी आस्थापनांचे व्यावसायिक आणि औद्योगिक कामगार या कर्नाटकातील मतदारांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी गोवा सरकारने पगारी सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, या आदेशावर GSIA ने नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT