Government School of Dhanagarwada Querim in Goa Dashrath Morajkar
गोवा

गोव्यात ४३ मुलांसाठी एकाच खोलीत भरतेय शाळा

गेल्या 10 वर्षांपासून येथील विद्यार्थी पटसंख्या वाढत असून ती आता पहिली ते चौथी अशा चारही वर्गात मिळून यंदा 43 विद्यार्थी आहेत

दैनिक गोमन्तक

शिक्षणासाठी चांगली साधनसुविधा गरज असताना सत्तरीतील धनगरवाडा केरी (Government School of Dhanagarwada Querim in Goa) येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाला नवीन वर्ग खोली उभारण्याकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. सत्तरीत सरकारी प्राथमिक विद्यालयामध्ये विद्यार्थी पटसंख्या घटत चालली असताना धनगरवाडा येथील विद्यालयात गेल्या दहा वर्षांपासून ही संख्या वाढतच आहे. अशा वाढत्या पटसंख्यानुसार शाळेला नवीन वर्ग खोलीची गरज आहे.

पण अशा वर्ग खोलीची आवश्यकता असताना शिक्षण खात्याने याकडे हेतुपुरस्कृत दुर्लक्षित केल्याचे दिसते. त्यामुळे एका बाजूने इथले पालक आपल्या मुलांना या सरकारी विद्यालयात पाठवण्यासाठी इच्छुक असताना देखील विद्यालयाच्या वर्गाअभावी दूरच्या खाजगी विद्यालयात पाठवत आहे.

धनगरवाडा प्राथमिक विद्यालय हे या केरी पंचक्रोशीत सर्वात जास्त विद्यार्थी पटसंख्या असलेली ही सरकारी प्राथमिक विद्यालय आहे. 1989 मध्ये येथे एका खोलीची इमारतीत प्राथमिक वर्ग सुरु झाले होते. त्यावेळेस सकाळी आणि दुपारी असे वर्ग चालायचे. त्यानंतर यांची पटसंख्या कमी झाली आणि सरकारच्या नवीन धोरणानुसार शाळा सकाळच्या वेळी चालायला लागल्या. पण काही गेल्या 10 वर्षांपासून येथील विद्यार्थी पटसंख्या वाढत असून ती आता पहिली ते चौथी अशा चारही वर्गात मिळून यंदा 43 विद्यार्थी आहेत. गेल्या वर्षी हा आकडा 42 विद्यार्थी होता तर 2019- 20 या शैक्षणिक वर्षात 40 विद्यार्थी होते. कोरोनामुळे या व गेल्यावर्षी शाळेमध्ये मुले येत नसल्याने त्यांना एकाच वर्गामध्ये बसून शिक्षण घेणे जरी टाळले असले तरी जर या वर्षीची शाळा सुरू झाल्यास त्यांना एकाच वर्गामध्ये शिक्षण घ्यावे लागणार आहे. तेव्हा सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष वेधून येथे त्वरित नवीन वर्ग उभारावा अशी मागणी इथल्या पालकांकडून होत आहे.

दोन वर्ग व्हरांड्यात बसून शिक्षण घ्यायचे

दरम्यान 2019-20 या शैक्षणिक वर्षात येथे चारही वर्गाचे मिळून 40 विद्यार्थी होते. या 40 मुलांना एकाच वर्गात बसण्यापेक्षा यातील दोन इयत्तेचे वर्ग शाळेच्या मुख्य खोलीत तर दोन इयत्तेची मुले व्हरांड्यात बसून शिकवले जायचे. त्यासाठी व्हरांड्यात बाक घातलेले व फळा लावलेला आहे. शाळेच्या व्हरांड्याची जागा ही अतिशय लहान असल्याने त्यात मुलांना चालता सुध्दा येत अशी परिस्थिती होती. तसेच व्हरांड्यात बसलेली मुले बाहेर रस्त्यावरून कुणी वाहनांची ये-या झाल्यावर बाहेर डोकावून पाहत असत. अशाने मुलांचे शिकवणीकडे लक्षही लागत नसत. आता पुन्हा जर शाळा सुरू झाली तर पुन्हा तोच प्रकार येथे पाहायला मिळणार आहे.

विद्यालयाच्या व्हरांड्यात विद्यार्थी बसवण्यासाठी टाकलेले बाक

विद्यालयाच्या नवीन वर्गाकडे दुर्लक्ष

गेल्या 10 वर्षांपासून या शाळांची पटसंस्था वाढत चालली आहे तर गेल्या 9 वर्षांपासून ती 25 पेक्षा जास्त आहे. जेव्हा ही पटसंख्या वाढायला सुरुवात झाली तेव्हा इथल्या पालक शिक्षक संघाने विद्यालायसाठी नवीन वर्गाची मागणी करीत आहे. यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न करून संबंधित अधिकाऱ्यांना भेटून नवीन खोलीचे प्रस्ताव पाठवले होते. एक प्रस्ताव तर गोवा साधनसुविधा विकास मंडळाकडे मंजूर झाला होता. पण त्यांनंतर तो पूर्णत्वास आलाच नाही. यावरून सरकारला याकडे गांभीर्य नसल्याचे मत पालक व्यक्त करतात.

पूर्णवेळ शिक्षकाची कमतरता

एका बाजूने शाळेच्या इमारतीची वावना असताना दुसऱ्या बाजूने शाळेत शिक्षण देणारे सर्व शिक्षक ही कायमस्वरूपी नाही. गेल्या 9 वर्षांपासून या शाळेची पटसंख्या 25 पेक्षा जास्त आहे. 25 पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांना दुसरा शिक्षक मिळतो. येथे सहा वर्षांपूर्वी दुसरा शिक्षक मिळाला तो ही कंत्राटी पद्धतीवर असलेला. पण अजून सहा वर्षे उलटूनही त्या जागी कायमस्वरूपी शिक्षक पुरवला नाही. त्याचप्रमाणे पूर्वी येथे आठवड्यातुन 3 दिवस इंग्रजी विषय शिकणावरी शिक्षिका यायची पण तिचा एक दिवस कपात केला आहे. अशा या सर्व प्रकारामुळे सरकारचे येथे हेतुपुरस्कृत दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होते.

नवीन खोलीसाठी असलेली जागा

विद्यार्थी पटसंख्या कमी असलेल्या शाळांची दुरुस्ती

केरी व सत्तरीतील परीसरात विद्यार्थी पटसंख्या कमी असलेल्या व संख्या घटत असलेल्या शाळाची पुनर्बांधणी, दुरुस्ती करण्याचे काम सरकार करीत आहे. अशा नवीन उभारलेल्या शाळांची उपयोग मात्र पूर्णपणे होताना दिसत नाही. पण या शाळेत मात्र विद्यार्थी पटसंख्या वाढून याकडे मात्र दुर्लक्ष केल्याने गरज आहे तिथे पोहचत नाही असे दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT