Goa: उत्तर गोव्याचे माजी खासदार गोपाळराव मयेकर यांच निधन

१९८९ साली ते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते.
Former North Goa MP Gopalrao Mayekar dies
Former North Goa MP Gopalrao Mayekar diesDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर गोव्याचे माजी खासदार गोपाळराव मयेकर यांचे गुरुवारी निधन झाले आहे.वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या कुटुंबाकडून ही माहिती देण्यात आली आहे. ते माजी खासदार, माजी शिक्षण मंत्री, सिध्दहस्त लेखक आणि मराठी भाषा व संस्कृतीचे जाज्वल्य अभिमानी प्राध्यापक होते. तसेच त्यांनी गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष पदही भूषवलं होते. ते एक मोठे कवी देखील होते.

१९८९ साली ते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. तत्पूर्वी त्यांनी ७० च्या दशकात ते गोव्यचे आमदार व शिक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. विद्वान साहित्यिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक, तेजस्वी वक्ता अशी त्यांची गोवा व महाराष्ट्राला ओळख होती. त्यांचे संपूर्ण बालपण मुबंईत गेले होते तर नंतर ते गोव्यात म्हापसा येथे स्थयिक झाले होते.

Former North Goa MP Gopalrao Mayekar dies
Goa Rain: साखळी परिसरात महापूर; 23 जणांना वाचविण्यात यश

“माजी राज्यमंत्री, माजी खासदार आणि लेखक प्रा. गोपालराव मयेकर यांच्या निधनामुळे दु: खी. सार्वजनिक जीवनात त्यांचे अतुलनीय योगदान कायम स्मरणात राहील. शोकाकुट झालेल्या कुटुंबाबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो, असे ट्विट करत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com