Cm Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Kushavati District: नवीन जिल्हा मुख्यालयासाठी केपे सज्ज, कुशावती योग्य नाव; केपेवासीयांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

Third District Goa: जिल्हा मुख्यालयाच्या सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केपे शहर सज्ज असल्याचेही केपेवासीयांनी या भेटीत मुख्यमंत्र्यांना सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: केपेतील जिल्हा पंचायत सदस्य, नगराध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, पंच व नागरिकांनी माजी उपमुख्यमंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यावेळी नवीन जिल्ह्यास ‘कुशावती’ हे योग्य नाव दिल्याबद्दल तसेच केपे शहराला जिल्हा मुख्यालय केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे उपस्थित होते.

जिल्हा मुख्यालयाच्या सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केपे शहर सज्ज असल्याचेही केपेवासीयांनी या भेटीत मुख्यमंत्र्यांना सांगितले. केपे शहराला प्रशासकीय इतिहास असून केपे शहराला पूर्वी दक्षिण गोव्याच्या उपजिल्ह्याचा दर्जा होता.

केपे येथे तुरुंग, न्यायालय, नगरनियोजन खात्याचे कार्यालय तसेच इतर प्रशासकीय कार्यालये आहेत. यामुळेच नवीन जिल्ह्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू असताना केपे जिल्हा मुख्यालय योग्य असल्याची बाब आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती, असे कवळेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले.

अग्निशमन दल उभारणीसाठी आधीच पायाभरणी

केपे येथे पोलिस स्थानक, अग्निशमन दलाचे केंद्र यासाठी आधीच निर्धारित जागेवर पायाभरणी झालेली आहे. चारमजली कृषी भवनसाठी तसेच पुराभिलेख कार्यालयासाठी आधीच जागा निश्चित करून पायाभरणीही करण्यात आली आहे. जिल्हा मुख्यालयासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी या जागा उपलब्ध आहेत, असे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 2nd ODI: विराट कोहलीचा राजकोटमध्ये धमाका! सचिन तेंडुलकरचा मोडला 17 वर्षांचा रेकॉर्ड; न्यूझीलंडविरुद्ध बनला भारताचा 'रनमशीन' VIDEO

Goa Assembly Session: मंत्रिमंडळ निर्णयांच्या गोपनीयतेवरून विधानसभेत रणकंदन; 16 जानेवारीला चर्चेची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Crime News: प्रेम, धोका अन् टोकाचं पाऊल! 21 वर्षीय एअर होस्टेसनं संपवलं जीवन; लग्नाचं आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

Goa Winter Session 2026: गोव्याची हवा विषारी झाली! पणजी, पर्वरीसह प्रमुख शहरांत प्रदूषणाने ओलांडली धोक्याची पातळी; हवेच्या गुणवत्तेवरुन युरींचा सरकारला जाब

ICC Rankings: किंग कोहलीचं 'विराट' पुनरागमन! 1403 दिवसांनंतर पुन्हा बनला जगातील नंबर 1 फलंदाज; हिटमॅनला फटका

SCROLL FOR NEXT