Bicholim Theft News Dainik Gomantak
गोवा

Bicholim Theft: ..पुन्हा चोरट्यांचा धुमाकूळ! मंदिरांनंतर आता दुकाने लक्ष्य; जुन्या बाजारात मारला पन्नास हजारांचा डल्ला

Bicholim News: अज्ञात चोरट्यांनी फुलांच्या बाजारासमोरील गल्लीतील अनुज दशरथ नार्वेकर यांचे दुकान फोडून दुकानातील रोख रकमेसह अन्य वस्तू लंपास केल्याची माहिती मिळाली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Old Market Theft News

डिचोली: मंदिरे फोडण्याच्या वाढत्या घटनांमुळे डिचोली शहरात खळबळ माजली असतानाच, शहरातील एक दुकान फोडण्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी शहरातील जुन्या बाजारातील एक दुकान फोडून ५० हजारांहून अधिकचा ऐवज लंपास केला.

अज्ञात चोरट्यांनी फुलांच्या बाजारासमोरील गल्लीतील अनुज दशरथ नार्वेकर यांचे दुकान फोडून दुकानातील रोख रकमेसह अन्य वस्तू लंपास केल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी रोजच्याप्रमाणे दुकानातील कामगार दुकानापाशी आले असता, दुकानाच्या दरवाजाची कुलूपे तसेच कडी तोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. लागलीच त्यांनी दुकान मालकांशी संपर्क साधला. मालक अनुज नार्वेकर यांनी येऊन पाहणी केल्यानंतर

डिचोली पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड तसेच किमती वस्तूंची चोरी केल्याचे दिसून आले.

दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा नादुरुस्त असल्याने तपासात अडथळा निर्माण झाला. या चोरीप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोलीचे पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, बाजारातील जे दुकान फोडण्यात आले आहे, त्या दुकानापासून एकदम जवळ असलेले श्री कोटेश्वर देऊळ जुलैमध्ये चोरट्यांनी फोडले होते. त्याचा अद्याप छडा लागलेला नाही. इतक्यात, आता दुकान फोडल्याने बाजारातील व्यापारी चिंताग्रस्त बनले आहेत.

दरम्यान, वाढत्या चोऱ्यांप्रकरणी छडा लावण्यात पोलिस असमर्थ ठरत आहेत, असा दावा बाजारातील दुकानदारांनी केला आहे. पोलिसांनी सक्रिय होण्याची गरज आहे.

पोलिस गस्त वाढवण्याची मागणी

गेल्या जवळपास तीन महिन्यांपासून चोरांनी डिचोली शहरात धुमाकूळ घातला आहे. मागील जून महिन्यात चोरांनी एकाच रात्री शहरातील चार मंदिरे फोडली होती. या चोऱ्यांचा तपास लागला नसतानाच, त्यानंतर महिनाभरात जुलै महिन्यात शहरात एकाच रात्री आणखी दोन मंदिरे फोडण्यात आली. शहरातील चोरीचे प्रकार बंद झाले, असे वाटत असतानाच, १५ दिवसांपूर्वी ऐन चतुर्थीत चोरांनी पुन्हा कारवाया सुरू करून शहरातील श्री शिवलिंग मंदिर फोडले. या मंदिरातील चोरीप्रकरणी डिचोली पोलिसांनी एका संशयिताला अटक केली, मात्र अन्य चोऱ्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. डिचोलीत रात्रीच्यावेळी पोलिस गस्त ठेवावी, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT