Panjim Theft News Dainik Gomantak
गोवा

Panjim Theft News: वाहनातील 9 लाखांचा ऐवज लंपास : गुन्हा दाखल

Panjim Theft News: पणजीत पार्क करून ठेवलेल्या वाहनामधील किमती साहित्य तसेच 2 लाख रुपये रोकड मिळून सुमारे 9 लाखांचा ऐवज चोरांनी लंपास केला.

दैनिक गोमन्तक

Panjim Theft News: पणजीत पार्क करून ठेवलेल्या वाहनामधील किमती साहित्य तसेच 2 लाख रुपये रोकड मिळून सुमारे 9 लाखांचा ऐवज चोरांनी लंपास केला. ही घटना 7 तारखेला रात्री 10.30 ते पहाटे 4.20 च्या दरम्यान घडली.

याप्रकरणी हैदराबादेतील श्रीधर रेड्डी यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रेड्डी यांनी भाडेपट्टीवर रेंट ए कार घेतली होती. या कारमध्ये त्यांचे साहित्य ठेवलेल्या ४ बॅगा होत्या. गाडीमध्ये साहित्य ठेवून ते जवळच खरेदीसाठी गेले होते.

ते कारकडे परतले असता, वाहनाच्या डाव्या बाजूकडील काच फोडून दारे उघडलेली आढळली. तसेच आतील बॅगा लंपास केल्या होत्या.

या बॅगांमध्ये 5 लाख रुपये किमतीचे दोन मॅकबुक लॅपटॉप, 70 हजारांचे सन ग्लासेस, 50 हजारांचा डेसन हेअर ड्रायर, 50 हजारांचे चप्पल्स, एक पासपोर्ट तसेच पाकिटामध्ये विविध बँकांची एटीएम कार्डस् तसेच रोख रक्कम होती.

याप्रकरणी पणजी पोलिसांनी जवळच्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू केला आहे. चोरांनी तक्रारदार आणि त्यांचे मित्र कोठे जातात हे त्यांच्या मागावर राहून पाहिले असावे आणि रात्री उशिरापर्यंत ते परतणार नाहीत, याची खात्री करूनच ही चोरी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT