Thieves from Belgaum caught by Margao Railway Police Dainik gomantak
गोवा

बेळगावचे चोर मडगाव रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात

तीन चोरट्यांकडून चोरीचे साहित्य जप्त

दैनिक गोमन्तक

मडगाव : बेळगावहुन चोरी करून गोव्यात आलेल्या तीन चोरट्यांना आज मडगाव रेल्वे पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 1.75 लाखांचा माल जप्त केला. आज सकाळी मडगाव रेल्वे स्थानकावर तिघे संशयास्पद रीतीने वावरत असताना ड्युटीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या सामानाची झडती घेतली असता त्यांच्या बॅगेत एक लॅपटॉप, दोन टॅबस, चार मोबाईल आणि दोन मनगटी घाड्याळे सापडली.

अधिक चौकशी केली असता ती त्यांनी बेळगावी येथून चोरून आणल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ही खबर बेळगाव येथील टिळकवाडी पोलिसांना दिल्यावर त्यांनी मडगावात येऊन त्यांना ताब्यात घेतले.

दरम्यान, कुडचडे येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाचा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी खामामळ-कुडचडे येथे फिलिंग पॉईंट उभारण्यात आला आहे. या पॉईंटजवळ संबंधित खात्यातर्फे कोणाचीच नियुक्ती न केल्याने पाण्याची दिवसाढवळ्या चोरी होत असल्याने सरकारला लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाने फिलिंग पॉईंट ओसाड सोडल्याने जो तो येऊन टँकरद्वारे पाणी चोरून नेत असल्याने सरकारी तिजोरीला लाखोंचा फटका बसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

SCROLL FOR NEXT