ATM Canva
गोवा

Caranzalem Crime: गस्तीवरच्या पोलिसांना पाहून चोरट्यांचा पळ! करंझाळे येथे 'एटीएम' लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न

Caranzalem News: करंझाळे येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएममधील पैसे लुटण्याचा प्रयत्न काल रात्री काही चोरट्यांनी केला. रात्रीच्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना पाहून तेथून चोरट्यांनी पळ काढल्याने तो फसला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: करंझाळे येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएममधील पैसे लुटण्याचा प्रयत्न काल रात्री काही चोरट्यांनी केला. रात्रीच्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना पाहून तेथून चोरट्यांनी पळ काढल्याने तो फसला.

याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला नसला तरी पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू करून संशयितांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांच्या गस्तीमुळे चोरीची घटना टळली. त्यामुळे पोलिस गस्त अधिक तीव्र करण्यात आली आहे.

यासंदर्भात चौकशी करताना पोलिसांना मिरामार येथे गुजरात नोंदणी असलेली गाडी पदपथावर उभी करण्यात आली होती. त्या गाडीला व्हील क्लॅम्प लावण्यात आले होते, मात्र चौकशीअंती या गाडीचा या चोरीशी काहीच संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

एटीएममध्ये असलेल्या सीसी टीव्ही कॅमेरामध्ये एक युवक आतमध्ये घुटमळत असल्याचे दिसले. त्या ठिकाणी गाडी थांबून पोलिस तेथे पोचेपर्यंत तेथील काळोखाचा फायदा घेऊन त्या युवकाने तेथून पळ काढला. हा युवक मनोरुग्ण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

एटीएममध्ये इतक्या रात्री तो काय करत होता याची माहिती तेथील सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT