Ponda Theft News Dainik Gomantak
गोवा

Ponda Theft News: चोरट्यांनी फोडली एकाच इमारतीतील बारा दुकाने

Goa Thieves Case: पोलिस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इमारतीत चोरट्यांनी दरवाजांच्या कड्या तोडून केला प्रवेश

गोमन्तक डिजिटल टीम

फोंड्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या काझीवाडा भागातील कुरतरकर कमर्शियल आर्केड या इमारतीत बुधवारी (ता.२६) रात्री अज्ञात चोरट्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील एकूण बारा दुकानेवजा आस्थापने फोडली.

फोंडा पोलिस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या इमारतीत एवढी दुकाने फोडण्यात आल्याने व्यावसायिकांत भीती व्यक्त करण्यात येत आहे.

चोरट्यांनी या सर्व आस्थापनांच्या दरवाजांच्या कड्या तोडून आत प्रवेश केला. आतील साहित्याची उलथापालथ केली आणि दोन आस्थापनांमधील चार हजार रुपये तसेच एक मोबाईल फोन लंपास केला.

कर सल्लागार, डॉक्टर व मार्केटिंगशी संबंधित ही सर्व दुकाने असून आतील लॅपटॉप व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांना चोरट्यांनी हात लावला नाही, त्यामुळे रोकड पळवण्याचाच या चोरट्यांचा इरादा होता, असे स्पष्ट होत असल्याचे या व्यावसायिकांनी सांगितले.

चोरट्यांनी परत जाताना काही दुकानांचे दरवाजेही बंद करण्यात आले. या इमारतीत असलेल्या ‘आयएमए’ या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यालयाचीही कडी तोडण्यात आली. मात्र, आत काही सापडले नाही.

अन्य काही दुकानांना अत्याधुनिक लॉक पद्धती असल्याने तीही कापून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण चोरट्यांना यश मिळाले नाही. फोंडा (Ponda) पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

‘सीसीटीव्ही’ची व्यवस्था नाही

सकाळी चोरी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर फोंडा पोलिसांना कळविले. पोलिसांनी येऊन पाहणी केली व पंचनामा केला. विशेष म्हणजे या इमारतीत सीसीटीव्हीची व्यवस्था नाही, फक्त काही आस्थापनांनी आपल्यापुरती सीसीटीव्हीची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पोलिसांना या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरच निर्भर राहावे लागले; पण अजून तरी कुणाला ताब्यात घेतलेले नाही.

या इमारतीत चालतो जुगार?

रात्री जोरदार पाऊस असल्याने या चोरीचा अंदाज कुणाला आला नाही. चोरटे एकापेक्षा जास्त असावेत, असाही कयास व्यक्त करण्यात येत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या इमारतीत जुगार चालत असल्याचा संशयही काही व्यावसायिकांनी व्यक्त केला असून त्यामुळे पैशांसाठीच ही धाडसी चोरी केली असावी, असे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT