Goa Railway Dainik Gomantak
गोवा

Goa Railway: रेल्‍वेत गुंगीचे चॉकलेट देऊन लुटायचे

Goa Railway: अटक केलेल्या संशयितांमध्ये महमद सरताज (23), चंदन कुमार (29) आणि दारा कुमार (29) यांचा समावेश आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Railway: गोव्यात रस्त्याच्या कामासाठी आलेल्या आणि काम संपल्यानंतर आपली कमाई घेऊन मध्यप्रदेशला रवाना झालेल्या आठ मजुरांना गुंगीचे चॉकलेट्स खाऊ घालून त्यांना पूर्णपणे लुटणाऱ्या रेल्वे चोरांच्या टोळीतील तिघांना आरपीएफ पोलिसांनी आज अटक केली.

अटक केलेल्या संशयितांमध्ये महमद सरताज (23), चंदन कुमार (29) आणि दारा कुमार (29) यांचा समावेश आहे. हे तिघेही बिहारचे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यांना गोवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यांच्याकडून गुंगीची औषधे जप्‍त केली आहेत.

दोन वेळा घडला प्रकार

12 सप्टेंबर रोजी हे आठ मजूर गोवा एक्सप्रेसने वास्कोहून मध्यप्रदेशला रवाना होत असताना वास्कोहून थोड्या अंतरावर पोहोचल्यावर त्यांना गुंगीचे चॉकलेट्स खायला देऊन त्यांना बेशुद्ध केले होते. त्यांच्याकडील सर्व पैसे आणि मोबाईल फोन लुटले होते. त्यानंतर 20 सप्टेंबर रोजी अशाच प्रकारे कोकणकन्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटल्याची घटना घडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bardez: घरे नियमित करण्याचा निर्णय ऐतिहासिक, विरोधकांचा विरोध डावलून विधेयक मंजूर - दयानंद सोपटे

Prajwal Revanna: माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा

देशवासीयांनो आता फक्त 'स्वदेशी' वापरा, वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

"बँका कर्ज देत नसल्यास माझ्या कार्यालयाशी संपर्क साधा", CM सावंतांचे शेतकऱ्यांना आवाहन

Quepem: बारा लाखांचे दागिने पळविले; पण गुन्‍हाच नोंद नाही! FIR नोंदवायचा नसल्याच्या तक्रारदाराच्या सबबीची केपे पोलिसांकडून ढाल

SCROLL FOR NEXT