G-20 गोव्यात जी-20च्या चौथ्या पर्यटन कार्यगट आणि मंत्रीस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन मंत्रालयाच्यावतीने 19 ते 22जूनदरम्यान या बैठका होतील. यात ‘गोवा डिक्लेरेशन’ जाहीर करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय पर्यटन सचिव व्ही. विद्यावती यांनी दिली.
सचिव विद्यावती म्हणाल्या, भारताच्या जी-20 पर्यटन क्षेत्राअंतर्गत, पर्यटन कार्यगट परस्परांशी संबंधित असलेल्या पाच प्राधान्य क्षेत्रांवर काम करत आहेत. यामध्ये हरित पर्यटन, डिजिटलायझेशन कौशल्य, पर्यटन एमएसएमई आणि डेस्टिनेशन मॅनेजमेंट यांचा समावेश आहे.
यामध्ये शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पर्यटनासाठी गोवा पथदर्शी कार्यक्रम तयार करणे आणि जी-२० पर्यटनमंत्र्यांचे घोषणापत्र यांचा समावेश आहे. या दोन्हींना लवकरच अंतिम रूप दिले जाईल. बैठकीदरम्यान, जी-२० सदस्य देश, आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था या दोन्ही दस्तऐवजांचे स्वागत करतील, असे विद्यावती यांनी सांगितले.
या कार्यगटाच्या बरोबरच क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी धोरणांवर लक्ष केंद्रित करून, ‘मेकिंग क्रूझ टुरिझम एक मॉडेल फॉर सस्टेनेबल अँड रिस्पॉन्सिबल ट्रॅव्हल’ याविषयावर एका चर्चासत्राचे आयोजन केले जाणार आहे.
या चर्चासत्रात जी-२० सदस्य देश, आमंत्रित देश, आंतरराष्ट्रीय संस्था आणि उद्योजक भागधारकांचा सहभाग असणार आहे. यावेळी जागतिक स्तरावर क्रूझ पर्यटनाच्या वाढीतील आव्हाने आणि संधी यावर चर्चा केली जाईल. जी-२० सदस्य देश आणि अतिथी देशांमधील प्रतिष्ठित वक्ते या समूह चर्चेत सहभागी होतील.
पर्यटन मंत्रालयाच्यावतीने संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम व संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना यांच्या सहकार्याने पर्यटन क्षेत्रामध्ये प्लास्टिकच्या चक्राकार अर्थव्यवस्थेविषयी - ‘ग्लोबल टुरिझम प्लास्टिक इनिशिएटिव्ह’ या जी-20 बैठकीला समांतर कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे. - व्ही. विद्यावती, केंद्रीय पर्यटन सचिव
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.