Tourists Slams Goa Traffic Police: गोव्यात येणाऱ्या पर्यटकांबाबत अनेकदा काही ना काहीतरी घडत असल्याच्या घटना आपण पहिल्या आहेत. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. महाराष्ट्रातील कोल्हापूरमधून आलेल्या पर्यटकांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती.
तसेच त्यांनी सोशल मिडियावर गोवा पोलिसांच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केल्याप्रकरणी कोल्हापुरातील युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमधील चंदगड येथील ॲड. संतोष मळवीकर आणि अनिल गावडे या दोघांनी वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता. त्यांच्यामते गोव्यात चुकीच्या ठिकाणी पोलीस 'वन-वे'चे बोर्ड लावून वाहनचालकांची फसवणूक करत आहेत.
बागा - हणजूण बीच परिसरात अनेक पर्यटकांना या गोष्टीला सामोरे जावे लागत असल्याचे मत या युवकांनी व्यक्त केले होते. त्यांनी गोवा वाहतूक पोलिसांच्या कामावर ताशेरे ओढत मुद्दाम वाहनचालकांकडून ते पैसे घेत असल्याचा आरोप केला होता. शिवाय सोशल मिडियावर ‘गोवा पोलिसांपासून सावधान’ या शीर्षकाखाली एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामध्ये त्यांनी वाहतूक पोलिसांना जाब विचारल्याचे दिसत आहे.
त्यांनी पोलिसांना चुकीच्या ठिकाणी 'वन-वे' बोर्ड का लावला असा प्रश्न विचारला असता पोलिसांनी हे बोर्ड सरकारतर्फे लावण्यात आले असल्याचे सांगितले. एकमार्गी वाहतुकीच्या आडून पोलिस पर्यटकांची लूट करत असल्याचे या पर्यटकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून सरकारी कामात व्यत्यय आणल्याबद्दल हणजूण पोलिसांनी या दोघा पर्यटकांवर गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.