Nitin Gadkari at New Zuari Bridge second lane inauguration:  Dainik Gomantak
गोवा

Nitin Gadkari: गोव्यात करायला कामच शिल्लक राहणार नाही; केंद्रीय मंत्री गडकरींनी गोव्यासाठी केल्या 'या' महत्वाच्या घोषणा

नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटन, तीन कामांचे भूमीपूजन

Akshay Nirmale

Nitin Gadkari at New Zuari Bridge second lane inauguration: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गोव्यातील नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटन आज, शुक्रवारी थाटात झाले.

तसेच गोव्यातील नवीन विकासकामांचेही उद्घाटन यावेळी गडकरींनी केले. यावेळी रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे राज्यमंत्री व्ही. के. सिंग हे प्रमुख उपस्थित होते. दरम्यान, यावेळी भाषणात गडकरींना गोव्यासाठी अनेक घोषणा केल्या.

त्यांनी गोव्यातील कामांविषयी सांगताना हे सर्व झाले की गोव्यात करायला कामच उरणार नाही, अशी टिपण्णी केली. गडकरींना गोव्याबाबत काय घोषणा केल्या त्याविषयी जाणून घेऊया...

  • गोव्यातील रस्त्यांमधील ब्लॅक स्पॉट हटविण्यासाठी मुख्यमंत्री सावंत यांनी गडकरींकडे १७७.७३ कोटींची मागणी केली होती. त्यावर बोलताना गडकरी यांनी लगेचच १०० कोटी रूपये देत असल्याची घोषणा केली. काम सुरू करा, उर्वरीत ७७ कोटीही लवकर देऊ, असेही ते म्हणाले. लोकांचा जीव महत्वाचा आहे. गोवा अपघातमुक्त राज्य करा, असे आवाहनही त्यांनी केले.

  • जी-२० साठी राज्याने ४० कोटी रूपये खर्च केले. विशेषतः मडगाव बायपाससाठी. तो खर्च आमचा विभाग राज्याला देईल, अशी घोषणा गडकरींनी केली. सीआरएफ आणि सेतबंधनमध्ये पुन्हा १०० कोटी रूपये अतिरिक्त देण्याचेही जाहीर करतो. त्यांनी प्रस्ताव पाठवावा.

  • वार्षिक योजनेत ज्यांनी ९० टक्के जमिन संपादित केली आहे अशांना मंजुरी देऊ. मुख्यमंत्र्यांनी जे विषय मांडले त्याचा दोन दिवसांत प्रोजेक्टवाईज आढावा घेऊ आणि याकडे लक्ष देऊ.

  • गोव्यात ९८ कामे मंजूर झाली होती. त्यापैकी ७० पूर्ण झाली. २८ कामे सुरू आहेत. १० हजार कोटींची १२ कामे प्रस्तावित आहेत. हे सर्व झाल्यावर गोव्यामध्ये कामच उरणार नाही, असे गडकरी म्हणाले.

  • गोव्यात राष्ट्रीय महामार्गांचे २१२ किमीचे रस्ते दोन लेनवरून चारलेनमध्ये केले जात आहेत. त्याची किंमत १६००० कोटी रूपये आहे. त्यातील ९६ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.

  • आजच्या भूमीपूजनात पर्वरीतील ६ पदरी इलेव्हेटेड कॉरिडॉरचे भूमीपूजन झाले आहे. ५.१५ किलोमीटर याची लांबी आहे. हा मुंबई-गोवा महामार्गाचा भाग आहे. याची किंमत ६५० कोटी रूपये आहे. त्याचे टेंडर झाले आहे. कामही दिले आहे. ते काम गतीने पूर्ण होईल आणि लवकरात लवकर त्याचे उद्घाटन होईल.

  • राज्यातील इकनॉमिक कॉरिडॉर हैदराबाद-पणजी यात पणजी-कर्नाटक सीमा ६९ किमी रस्ता चारलेनचा बांधला जाईल. त्याची किंमत ५२०० कोटी रूपये आहे. त्यापैकी १९ किलोमीटर बांधून पूर्ण झालेला आहे.

  • यातील पर्यावरणविषयक परवानगींसाठी दिल्लीला पाठवा. मी पर्यावरण मंत्री भुपिंदर यादव यांना विनंती करून या गोष्टी क्लियर करून घेईन. ५० किलोमीटच्या रस्त्यासाठी १६३ कोटी मंजूर केले आहेत. जमिन संपादन केल्यास ताबडतोब कामास सुरवात करू.

  • मोपा एअरपोर्ट ते हायवे हा मार्गाचे काही काम राहिले आहे. सध्याही हा मार्ग वापरात आहे. मार्च २०२४ पर्यंत तो पूर्ण होईल. पोर्टशी कनेक्टिव्हिटीची कामे सुरू आहेत. काही पूर्ण झाली आहेत.

  • झुआरी टू मडगाव बायपास हा ७५० कोटींचा मार्गाचे काम लवकर सुरू कला. नावले ते कुंकळी ८०० कोटींचा रस्ताही लवकर सुरू करू. कुंकळी ते बाळ्ळी बायपास ६५० कोटीचा डीपीआर प्रोग्रेसमध्ये आहे. तोही लवकरच मंजूर करू.

  • काणकोण ते कर्नाटक सीमा ४०० कोटींचा प्रोजेक्ट डीपीआर प्रोग्रेसमध्ये आहे. अनमोड ते मोळे हा १३.४ किमीचा १५०० कोटींचा प्रोजेक्ट डीपीआर प्रोग्रेसमध्ये आहे. अशा १० हजार कोटींच्या कामांचे डीपीआर प्रोग्रेसमध्ये आहेत. त्याचे काम पुढील सहा महिन्यात सुरू होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT