Goa Fish Market Daink Gomantak
गोवा

Fish Price Hike In Goa: मासळी दर सामान्यांच्या आवाक्याबाहेरच!

आवक घटली : पापलेट हजार, तर इसवण आठशे

दैनिक गोमन्तक डिजिटल

Fish Price Hike In Goa: राज्यात मासळीच्या दरात वाढ झाली असून इसवण सातशे ते आठशे, तर पापलेट हजार रुपये किलो झाला आहे.

मासळीची आवक घटल्याने तसेच काही राज्यात सण आणि जत्रोत्सवांमुळे मासांहारात घट झाल्याने अनेक विक्रेते अल्प प्रमाणात मासळी बाजारात आणत असल्याने दरात वाढ झाली आहे.

आठवड्यात दीडशे रुपये किलो दराने मिळणारे बांगडे आता 200 रुपये किलो, बांगड्याचा दरही म्हणजे सर्वसामान्यांना परवडेनासा झाला आहे.

इसवण आठशे, तर पापलेट १ हजार रुपये किलो दराने विकला जात आहे. लेपो २५० -३०० रुपये, सुंगटे (कोळंबी) आकाराप्रमाणे ३०० ते ५०० रुपयांनी विकली जात आहेत. तारली देखील १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जात आहेत.

पणजी मासळी बाजारात इसवण, कर्ली, लेपो, माणकी, खुबे, कोळंबी, समुद्री खेकडे आदी विविध प्रकारची मासळी मुबलक प्रमाणात विक्रीस उपलब्ध होती. मासळी खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ अधिक होती.

काही मासळी विक्रेते किलोच्या दरात विकत होते; तर काहीजण वाट्याच्या दराने विकत होते. वाट्याच्या दराने लहान बांगडे १५० रुपयांना ८ ते १० या दराने उपलब्ध होते.

हॉटेलात दरवाढ ?

  1. मासळीचे हुमण, फिश फ्रायचा आस्वाद चाखण्यासाठी अनेक खवय्ये तसेच पर्यटक गोव्यात येतात. मात्र, वाढत्या मासळीच्या दरामुळे मासळी प्लेटच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  2. कोणाला तळलेली मासळी आवडते, तर कोणाला हुमणातली, कुणाला इसवणाची पोस्ता आवडतात, तर कुणाला प्रॉन्स फ्राय. मात्र, काहींना तर दररोजच्या जेवणात मासळी लागतेच लागते.

  3. अशावेळी मध्यमवर्गीयांना देखील ताज्या मासळी व्यतिरिक्त सुक्या खाऱ्या बांगड्यांवर दिवस ढकलावे लागत आहेत. येणाऱ्या काळात मासळीचा तुटवडा जाणवल्यास दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

Farmagudi Accident: फार्मागुडी येथे कार आणि दुचाकीचा अपघात, महिला जखमी

SCROLL FOR NEXT