Goa government only announce the scheme its harmful for state says MGP leader Deepak Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

Goa MGP: मगोपच्या फुटीला भाजपमधून हवा; नेतृत्वाला संशय

आराखडाप्रश्‍नी पक्ष धुरिणांचे सरकारला समर्थन

दैनिक गोमन्तक

Split In The Goa Maharashtrawadi Gomantak Party: पेडण्याच्या विभागीय नियोजन आराखड्याच्या मुद्यावरून तूर्त तरी मगो पक्षात फूट पडल्यातच जमा आहे. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी या आराखड्याविरोधात दंड थोपटले आहेत, तर पक्षाच्या धुरिणांनी सरकारच्या भूमिकेचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता याप्रकरणी सुवर्णमध्य काढण्यासाठी येत्या शनिवारी बैठक बोलावण्याचा विचार मगोपने चालवला आहे. विशेष म्हणजे, जीत यांच्या म्हणण्याला हवा देण्याचे काम सत्ताधारी भाजपमधूनच केले जात असावे, असा संशय मगो नेतृत्वाला आहे.

आरोलकर यांनी मांद्रेतील सरपंच, पंचांसह थेट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन जनतेचे त्या विषयावरील गाऱ्हाणे मांडले.

त्यानंतर नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे आणि पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याशी बैठक घेत आराखड्याला पेडणेवासीयांचे समर्थन असल्याचे चित्र तयार केले.

या मुद्यावर तूर्त जीत हे एकाकी पडल्याचे दिसून येत आहे. राणे यांनी तर त्या आमदाराचे फार्म हाऊस पाडून टाकण्याची कारवाई सुरू करण्याचे आदेश खात्याला दिल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. जीत यांनीही कारवाई करावीच, असे प्रतिआव्हान दिले आहे.

त्यांनी भू-रूपांतरासाठी आपण मंत्र्यांकडे गेलो नाही तर त्यांनी दूरध्वनीवर संपर्क साधून बोलावून घेतले होते, असा पलटवार केला आहे.

सुरवातीला तालुक्यातील पंच व सरपंच जीत यांच्यामागे असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, दुपारनंतर सारेजण राणे यांच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसले. त्यामुळे जीत यांना घेरण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाल्याचे मगोपचे मत बनले आहे.

अद्यापही पक्ष नेतृत्वाला विश्वासात न घेता सत्ताधारी आघाडीत असताना वेगळीच भूमिका घेतल्याप्रकरणी आमदारावर कारवाईचा विचार मगोपचे नेतृत्वाने अद्याप केलेला नाही.

मात्र, येत्या शनिवारी (ता.१४) जीत यांना पक्षाच्या केंद्रीय समितीसमोर बोलावून त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्यातील सुप्त संघर्षात सत्ताधारी गोटातूनही राणे विरोधकांकडून जीत यांना बळ दिले जात असावे, असा मगोपला संशय आहे.

त्यामुळे जीत यांच्यावर कारवाई किंवा त्यांना तत्काळ जाब विचारण्याचे मगोप टाळत आहे. मात्र, या विषयावरून मगोपमध्ये सध्या फूट पडल्याचे दिसून येत आहे.

आरोलकरांचे म्हणणे जाणून घेणार

"जीत आरोलकर यांनी सरकारविरोधी भूमिका कशी घेतली, हे माहीत नाही. त्यांचा ‘बोलविता धनी’ कोणीतरी वेगळाच असावा, असे दिसते. येत्या आठवडाभरात बैठक घेऊन त्यांचे म्हणणे आम्ही जाणून घेणार आहोत."

- दीपक ढवळीकर, अध्यक्ष, मगोप.

"पेडणेतील भू-रूपांतर आराखड्याप्रश्‍नी लोकच माझ्याकडे आले होते. त्यांनी आराखड्यामुळे कसा अन्याय होतोय, हे दाखवून दिले. त्यामुळे जनतेसोबत राहण्याचा मी निर्णय घेतला आहे. मात्र, याबाबत मगोपच्या नेतृत्वाशी बोललो नाही, हे खरे आहे."

- जीत आरोलकर, आमदार, मांद्रे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

Australian Open 2026: नव्या युगाची नांदी, 'अल्काराज' ठरला टेनिसचा नवा किंग! नोवाक जोकोविचचा पराभव करुन पटकावलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद VIDEO

Balochistan Violence: दमन आणि अत्याचाराचा पाकड्यांचा इतिहास...! बलुचिस्तानमधील हिंसाचारावरुन चिखलफेक करणाऱ्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर

Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुध ग्रहाची 'ट्रिपल चाल' पालटणार नशीब! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Illegal Beef Trafficing: चोर्ला घाटात मध्यरात्री थरार! पाच गायींच्या मांसासह दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; 20 वर्षीय तरुणाला बेड्या

SCROLL FOR NEXT