goa Dainik Gomantak
गोवा

Goa Dam : पावसाळ्यापर्यंत राज्यात पाणीटंचाईची शक्यता नाही; धरणांमध्ये पुरेसा जलसाठा

Goa Dam : सरासरी पुढील दोन महिन्यांसाठी जलसाठा पुरेल, अशी माहिती जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंते प्रमोद बदामी यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Dam :

पणजी, पावसाळ्याला सुरवात होईपर्यंत पाणीपुरवठा होईल इतका जलसाठा राज्यातील सात धरणांमध्ये आहे. त्यामुळे पाणीटंचाईची शक्यता नाही.

सध्या अंजुणे धरणात सर्वाधिक ७७.१० मीटर, तर पंचवाडी धरणात सर्वात कमी म्हणजे २०.०५ मीटर पाणीसाठा आहे. सरासरी पुढील दोन महिन्यांसाठी जलसाठा पुरेल, अशी माहिती जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंते प्रमोद बदामी यांनी दिली.

साळावली धरणात पाण्याच्या पूर्ण पातळीची उंची ४१.१५ मीटर आहे. या धरणाच्या जलसाठ्यात ३२.७३ मीटर उंच पातळी असून ८८०७ हेक्टर मीटर पाणी आहे. या भागात गेल्यावर्षी ४०४७.१० मि.मी. पाऊस पडला होता. अंजुणे धरणाची पूर्ण पातळी ९३.२० मीटर उंच असून सध्या त्यामध्ये ११७२ हेक्टर मीटर पाणी आहे व त्याची पातळी ७७.१० मीटर आहे.

आमठाणे धरणाची पूर्ण पाण्याच्या पातळीची उंची ५०.०३ मीटर असून सध्या त्यामध्ये असलेल्या पाण्याच्या पातळीची उंची ४३.८२ मीटर आहे. पंचवाडी हे सर्वात लहान धरण असून त्यातील पूर्ण पाण्याच्या पातळीची उंची २६ मीटर आहे. त्यापैकी सध्या त्यामध्ये असलेल्या पाण्याच्या पातळीची उंची २०.०५ मीटर आहे.

तिळारी धरणाची पूर्ण पातळीची उंची ११३.२० मीटर आहे. या धरणातून उत्तर गोव्याला अधिक तर पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या या धरणात ९४.१८ मीटर पाणी आहे. त्यामुळे पाणीटंचाईची शक्यता नाही.

चापोली धरणाची पाण्याची पातळी उंची ३८.७५ मीटर असून त्यात सध्या ३२.५३ मीटर पाणी आहे. गावणे धरणात ६३.५० मीटर उंचीची पूर्ण पाण्याची पातळी असून त्यामध्ये सध्या ५७.८८ मीटर उंचीपर्यंत पाणीसाठा आहे. त्यामुळे बहुतेक धरणांमध्ये असलेला जलसाठा पावसाळा सुरू होईपर्यंत पुरेसा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

जलवाहिन्यांना गळतीची समस्या कायम

राज्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा असल्याचा दावा जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी केला असला, तरी काही भागात पाण्याच्या समस्येमुळे नागरिक आंदोलने करून रस्त्यावरही आले होते. जलसाठ्यामध्ये पाणी आहे.

मात्र, पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनींना गळती लागत असल्याने सुरळीतपणे व योग्य दाबाने पाणी पोचत नाही. काहींची घरे उंचावर असल्याने पाण्याला दाब नसल्याने ते वरपर्यंत पोचत नाही. काहीजण पाणी भरून झाल्यावर त्याचा इतर कामांसाठी गैरवापर करतात. त्यामुळे पाण्याचा दाब कमी होतो, अशी माहिती या खात्याच्या सूत्राने दिली.

धरणातील सध्या असलेला पाण्याचा साठा (मीटरमध्ये)

अंजुणे ७७.१०

मीटर

गावणे ५७.८८

मीटर

आमठाणे ४३.८२

मीटर

साळावली ३२.७३

मीटर

चापोली ३२.५३

मीटर

पंचवाडी २०.०५

मीटर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IRCTC Tour Package: नव्या वर्षाचं सेलिब्रेशन गोव्यात! 'आयआरसीटीसी'ने आणलंय स्वस्त आणि मस्त टूर पॅकेज; लगेच करा बुकिंग

Super Sunday! आशिया कपसाठी भारत-पाकिस्तानमध्ये 'कांटे की टक्कर', कधी अन् कुठे पाहता येणार अंतिम सामना? जाणून घ्या

Eggs Cancer Rumour: अंडी खाणं 100% सुरक्षित, कॅन्सरच्या अफवांवर विश्वास ठेवू नका; 'FSSAI'चं स्पष्टीकरण

गोवा, कोकण भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाया घालणाऱ्या दुर्गानंद नाडकर्णी यांचे निधन; मुख्यमंत्र्यांनी अर्पण केली श्रद्धांजली

Bel Tree: कूर्मपुराणात लक्ष्मीचे निवासस्थान मानला गेलेला, शिवाच्या तांडवाला शांत करणारा 'बेलवृक्ष'

SCROLL FOR NEXT