Sadanand Tanawade Dainik Gomantak
गोवा

Goa BJP : मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत सदानंद तानावडे यांचं सुचक वक्तव्य

मुख्यमंत्री सावंत आणि तानावडे यांनी केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या

दैनिक गोमन्तक

Goa cabinet : राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या जोरदार चर्चा असताना भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. तूर्तास फेरबदलाची आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले.

मागील आठवड्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

अर्थात त्यावेळी भाजपशासित प्रदेशांमधील अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होती आणि त्यामध्ये येणाऱ्या चार राज्यांतील विधानसभांच्या निवडणुकांवर चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री पुण्याला गेल्यानंतर ते दिल्लीला गेलेत आणि मंत्रिमंडळ फेरबदलावर शिक्कामोर्तब होणार अशा चर्चांना ऊत आला होता.

यासंदर्भात तानावडे म्हणाले, की राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा म्हणजे केवळ अटकळे आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत अल्पावधीतच दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर गेल्याने २ कॅबिनेट मंत्र्यांना वगळण्यात आले आणि २ काँग्रेस पक्षांतरित आमदारांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते, हे फक्त अनुमान आहेत.

अशा प्रकारची कोणतीही हालचाल झाल्यास मुख्यमंत्री त्यावर निवेदन करतील, पण मी निश्चितपणे सांगू शकतो की किमान सध्या तरी मंत्रिमंडळात फेरबदल होणे शक्य नाही. मुख्यमंत्री वैयक्तिक भेटीवर दिल्लीत गेले असून त्यांनी काही केंद्रीय मंत्र्यांचीही भेट घेतली आहे, असा दावाही तानावडे यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT