Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Water Dispute: कळसा-भांडुराचे पाणी वळविण्याची गरजच नाही! - राजकुमार तोपन्नावर

कर्नाटकात 50 टीएमसीपेक्षा जास्त पाणी जाते वाया

गोमन्तक डिजिटल टीम

कर्नाटक सरकारला म्हादई नदीला मिळणाऱ्या कळसा व भांडुराचे पाणी वळविण्याची गरजच नाही. कारण कृष्णा जलतंटा लवादाच्या निकालाप्रमाणे कर्नाटकला मिळत असलेल्या १७७ टीएमसीपैकी 50 टीएमसीपेक्षाही अधिक पाणी वाया जात असल्याचे मत आम आदमी पक्षाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राजकुमार तोपन्नावर यांनी व्यक्त केले.

तोपन्नावर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही बाब स्पष्ट केली आहे. कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या सुधारित डीपीआरला केंद्रीय जल आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकार या प्रकल्पाचे काम कधीही सुरू करू शकते. त्याविरोधात गोव्यात लोकचळवळ सुरू झाली आहे. तर सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यातच म्हादईच्या विषयावरून राजकारण सुरू झाले आहे. यावर ‘आप’चे नेते तोपन्नावर यांनी कर्नाटकची योजना किती फसवी आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

...अन्यथा आफ्रिकेसारखी गोव्याची स्थिती

विवेकानंद पर्यावरण जागृती फाऊंडेशनने म्हादईविषयी जनजागृतीसाठी रविवारी सायकल रॅली काढली. रॅलीला प्रारंभ करतेवेळी पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर म्हणाले, पिण्यासाठी लागणारे पाणी असणाऱ्या नद्यांचे अस्तित्व टिकवून ठेवणे महत्त्वाचे बनले आहे. म्हादई आणि झुआरी नदीच्या पाण्यामधील क्षारतेच्या प्रमाणात तफावत आहे.

झुआरीच्या पाण्यात अधिक क्षारता आहे. जेव्हा समुद्राला भरती येते, तेव्हा म्हादईतील पाणी झुआरीमध्ये जाते आणि तिची क्षारता कमी होते. जर नदीमधील क्षारता वाढली तर आफ्रिकेत ज्याप्रमाणे स्थिती निर्माण झाली, तशी स्थिती गोव्यातही निर्माण होईल, अशी भीतीही केरकर यांनी व्यक्त केली.

...तर पर्यावरणावरही परिणाम

कृष्णा जलतंटा लवादाने महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तिन्ही राज्यांना पाण्याचे वाटप केले आहे. त्यापैकी कर्नाटकला मिळत असलेल्या पाण्यापैकी 50 टीएमसी पाणी वाया जात आहे. हे पाणी पिण्यासाठी वापरले जाऊ शकते. त्यासाठी म्हादईला येणारे पाणी वळविण्याची गरजच नाही. हे पाणी वळविले तर कर्नाटकातील पर्यावरणीय संवेदनशील अशा काही भागांवर नक्कीच परिणाम होऊ शकतो, असे तोपन्नावर म्हणाले.

- ऊस पिकासाठी म्हादईचे पाणी

कृष्णा नदीवरील अलमट्टी या धरणाची काही प्रमाणात उंची वाढविली तर येथील पिण्याच्या आणि शेतीच्याही पाण्याचा प्रश्‍न सुटू शकतो. म्हादईच्या कळसा व भांडुरा नदीचे पाणी वळविल्यास बेळगाव, धारवाड आणि हुबळीला काहीही फायदा होणार नाही. ते पाणी साखर कारखान्यांना लागणाऱ्या ऊस पिकांसाठी वळविले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पिण्यासाठी पाणी वळवायचे झाल्यास काली नदीचे पाणी वळविणे आवश्‍यक होते, असेही तोपन्नावर यांनी नमूद केले.

- राजकीय डाव साधण्याची भाजपची खेळी

धारवाड, बागलकोट, गदग येथील जे लोक पाणी मागत आहेत, त्यांना कृष्णेतून मिळणारे आणि आंध्रमध्ये वाहून जाणारे 50 टीएमसी पाणी पिण्यासाठी दिल्यास त्यांचा प्रश्‍न सुटणार आहे. कर्नाटकमध्ये सत्तेत येण्यासाठी भाजप सरकार म्हादईच्या प्रकरणावरून कर्नाटक आणि गोवा राज्यात भांडण लावत असल्याची टीकाही तोपन्नावर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT