CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

OCI Issue : ओसीआय प्रकरणी फसवणूक नाही! मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत

OCI Issue : पणजी येथे पत्रकारांनी विचारलेल्‍या प्रश्‍‍नावर मुख्‍यमंत्री बोलत होते. ते म्‍हणाले, कोणताही निर्णय घेण्याची एक प्रक्रिया असते.

गोमन्तक डिजिटल टीम

OCI Issue :

पणजी, ‘ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया’ अर्थात ‘ओसीआय’ प्रकरणी कोणतीही फसवणूक केलेली नाही. केंद्रीय गृह मंत्रालयाने हा मुद्दा विचारात घेतलेला आहे आणि राज्य सरकार त्याचा पाठपुरावा करीत आहे, असा निर्वाळा मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

पणजी येथे पत्रकारांनी विचारलेल्‍या प्रश्‍‍नावर मुख्‍यमंत्री बोलत होते. ते म्‍हणाले, कोणताही निर्णय घेण्याची एक प्रक्रिया असते. पासपोर्ट मागे घेतल्याचा दाखला ओसीआयसाठी वैध ठरेल, असा केंद्रीय गृह मंत्रालय निर्णय घेईल, याची आपल्‍याला खात्री आहे. सदर प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी हा विषय सोडवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीवारी केली होती. त्यांच्यासोबत या विषयातील जाणकार मानले जाणारे पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेराही होते. मुख्यमंत्र्यांनी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांची भेट घेऊन सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती.

त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एक कार्यालयीन सूचना जारी करून पोर्तुगालमध्ये जन्माची नोंद असलेल्या गोमंतकीयांनी आपला भारतीय पासपोर्ट नूतनीकरणासाठी दिला, तर तो मागे घेण्यात आल्यानंतर मागे घेण्यात आल्याचे जारी केलेले प्रमाणपत्र ओसीआय कार्ड मिळवण्यासाठी पात्र ठरेल असे कळवले होते.

त्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीत सत्ताधारी भाजपकडून हा प्रश्न सोडवण्यात आल्याचा मोठा गवगवा करण्यात आला होता. या कार्यालयीन सूचनेनुसार परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या लक्षात आले की पासपोर्ट जारी करणे किंवा तो मागे घेणे हा केंद्रीय गृहमंत्र्याच्या अख्यत्यारीतील विषय आहे.

त्यामुळे या कार्यालयीन सूचनेला एक शुद्धिपत्रक काढून त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निर्णयावर याची अंमलबजावणी अवलंबून आहे असा खुलासा केला होता.

यामुळे प्रश्न सुटल्याचा दावा करून भाजपने जनतेची फसवणूक केली असा आरोप करणे विरोधकांनी सुरू केले आहे.

१ ओसीआयबद्दलची दोन्ही परिपत्रके परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काढली होती.

२शुद्धिपत्रकात कुठेच प्रस्ताव नाकारण्यात आला नसून गृहमंत्रालयाच्या सूचनेनंतर निर्णय घेण्यात येईल असे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT