Minister Govind Gawade Dainik Gomantak
गोवा

कला अकादमीच्या मूळ वास्तुत कोणताही बदल नाही : गोविंद गावडे

कंत्राटदाराला ऑगस्टची ‘डेडलाईन’!

दैनिक गोमन्तक

पणजी : कला अकादमीच्या मूळ वास्तुच्या बांधकामात कोणताच फेरफार वा बदल करण्यात आलेला नाही तर नूतनीकरण करण्यात येत आहे. सर्व बांधकाम पारदर्शक असून ते वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बांधकाम समाधानकारक असून ऑगस्टअखेर लोकार्पण करण्यासाठी कंत्राटदाराला काम पूर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली आहे. पावसाची स्थिती व तांत्रिक अडचणी यावरही ते अवलंबून आहे अशी माहिती कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून कला अकादमीच्या बांधकामावरून विरोधक तसेच चार्लस् कुरैय्या फाउंडेशनने केलेल्या आरोपांचे त्यांनी खंडन करण्यासाठी मंत्री गोविंद गावडे यांनी आज बांधकामाची माहिती देण्यासाठी पत्रकारांना घटनास्थळी प्रत्यक्षात नेले व त्यात काही गैर असल्यास त्याबाबत माहिती देतो असे स्पष्ट सांगितले. आतापर्यंत सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे व उर्वरित 40 टक्के काम महत्वाचे आहे. राज्यात पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने त्याचा व्यत्यय कामात येऊ शकतो. हे नूतनीकरणाचे काम सर्व बाजूने पत्रे लावून ते सुरू असल्याचा आरोप केला जात आहे मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने ते लावण्यात आले असून त्यात काहीच गैर काम सुरू नाही. चार्लस् कुरैय्या फाऊंडेशनला हे काम सुरू होण्यापूर्वी त्यांना सूचना करण्यास तसेच त्यांना बैठकीसाठी निमंत्रणही देण्यात आले होते मात्र त्यांनी त्याची दखल घेतली नाही मात्र काम अंतिम टप्प्यात असताना ते त्रुटी काढत असल्याचे ते म्हणाले.

चार्लस् कुरैय्या फाऊंडेशनने कला अकादमीची रचना करून हे बांधकाम करण्यात आले होते. त्यावेळी या ठिकाणी पाण्याची पातळी तसेच इतर बाबींचा सखोल विचार करून व ते मुद्दे गृहित धरून हे बांधकाम केले असते तर हे नूतनीकरणाचे बांधकाम करण्याची वेळ आलीच नसती. त्या रचनेमध्ये असलेले चुकीच्या रचनेमुळे नाट्यगृहात पाणी घुसत होते. पावसाळ्यात त्याचा वापर करणे शक्य होत नव्हते. काही ठिकाणी छप्परातून पाणी झिरपत असल्याने अनेक समस्यांना कलाकारांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळेच हे नुतनीकरण करण्यात येत असून एकही खांबा किंवा भिंत हलवण्यात आलेली नाही. हे बांधकाम अधिक मजबूत करण्याच्या हेतूनेच सुरू करण्यात आले आहे. या कामाबाबत राजकारण होत असले तरी कलाकारांनी या कामाला आक्षेप घेतलेला नाही. यावेळी त्यांनी नाट्यगृह, खुले नाट्यगृह तसेच प्रशासन कार्यालय व कलाकारांसाठीचे वर्ग याचे बांधकाम त्यांनी पत्रकारांना दाखवले. या नूतनीकरणावेळी उच्च दर्जाचे काम करण्यात येत असल्याचे गावडे म्हणाले.

सुमारे 40 कोटींच्या कामाचे हे बजेट असून त्यातील आतापर्यंत झालेल्या कामापोटी कंत्राटदाराला 10 कोटींपेक्षा अधिक कामाची रक्कम देण्यात आली असली तरी सुमारे 70 ते 80 टक्के कामाची बिले अजून देणे बाकी असून ती सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत पाहिली जात आहेत, असे मंत्री गावडे म्हणाले.

इलेक्ट्रिसिटी व वॉटर प्रुफिंग तसेच रंगकाम हे काम अजूनही आहे. या नाट्यगृहासाठी वापरण्यात येणारी संगीत सामग्री व उपकरणे ही उच्च दर्जाची असतील. बांधकामाबाबत आरोप केले जात असल्याने कंत्राटदारावरही दडपण येते व त्याला काम करण्यास मुक्त वातावरण मिळत नाही. त्याचा कामावरही परिणाम होतो. नव्याने कोणतेच बांधकाम केले जात नाही तर नूतनीकरणामध्ये दुरुस्ती तसेच फिनिशिंग यांचा समावेश आहे, असे मंत्री गावडे यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ब्रेकअप झालं अन् तिनं चक्क Chat GPT सोबत केलं लग्न; AI पार्टनरच्या प्रेमात बुडाली जपानी तरुणी Watch

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

Goa News Live: गोवा नाईटक्लब आग प्रकरण; बर्च बाय रोमिओ लेनच्या सहमालकाची जामिनासाठी कोर्टात धाव

SCROLL FOR NEXT