Theft Case Dainik Gomantak
गोवा

Goa Theft Case: कुंकळ्ळीत घरफोडी; साडेआठ लाखांचे दागिने, रोकड लंपास

Goa Theft Case: अज्ञात चोरांनी या घराचा मुख्य दरवाजा फोडून घरात ठेवलेला अॅल्युमिनियमचा बॉक्स चोरून नेला.

गोमन्तक डिजिटल टीम

दक्षिण गोव्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, दोन दिवसांपूर्वी बाळ्ळी येथे एका घरात चोरी होऊन लाखांचे दागिने चोरल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी कुंकळ्ळी पोलिस स्थानकाच्या हद्दीतील केगदीकट्टो येथे एका घरात अज्ञात चोरांनी सुवर्णालंकार, रोकड मिळून सुमारे साडेआठ लाखांचा ऐवज लंपास केला.

याप्रकरणी ओपेंद्र चंद्रलाल पावल यांनी कुंकळ्ळी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. भादंसंच्या ४५७ व ३८० कलमांखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवले असून, अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कविता रावत पुढील तपास करीत आहेत.

बुधवार, ता. १७ एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली. पावल हे भाड्याच्या घरात राहातात. अज्ञात चोरांनी या घराचा मुख्य दरवाजा फोडून घरात ठेवलेला अॅल्युमिनियमचा बॉक्स चोरून नेला.

सासष्टीत चोरट्यांचा धुमाकूळ

दक्षिण गोव्यातील सासष्टीत सातत्याने चोरीच्या घटना समोर येत आहेत. रविवारी भरदिवसा बेताळभाटी परिसरात घर फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला होता. घरमालकांनी चोरट्यांची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देणार असल्याची घोषणा केली.

रविवारी रात्री बाळ्ळी येथे देखील चोरी झाल्याचे समोर आले, चोरट्यांनी घरातून साडेचार लाखांचा मुद्देमाल चोरी केल्याचे उघड झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT