Theft at Temple in Ladfem Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim: लाडफे गावातील मंदीरातून चोरट्यांनी फंडपेटी पळवली, दहा हजारांची रक्कम चोरी

पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे.

Pramod Yadav

Theft in Temple at Ladfem Bicholim: डिचोली, लाडफे गावातील मंदीरातून चोरट्यांनी चोरी केली आहे. मंदीराचा टाळा तोडून तेथील फंडपेटी चोरी केली. फंडपेटी फोडून त्यातील दहा हजार रूपये चोरी केल्याची माहिती मंदीराच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डिचोली तालुक्यातील लाडफे गावातील श्री महादेव मंदिरात चोरी झाली आहे. मंदिराचे मुख्य दार तोडून चोरट्यांनी देवळातील फंडपेटी पळवली आहे. फंडपेटी बाहेर घेऊन देवळापासून काही अंतरावर ती फोडली आणि त्यातून दहा हजार रूपये चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, चोरट्यांनी फंडपेटी तेथेच सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

घडलेल्या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. श्वानांच्या पोलिसांनी सभोवताली शोध घेण्याचा प्रयत्न केला. हाताचे ठसे देखील येथून घेण्यात आले असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT