Bicholim Goa Dainik Gomantak
गोवा

एक फंडपेटी फोडली, दुसरी पळवली! डिचोलीत पुन्हा चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत दोन मंदिरे फोडली

Bicholim Goa: मध्यरात्रीच्या सुमारास ही मंदिरे फोडली असावीत, असा अंदाज आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली शहरात पुन्हा एकदा मंदिरे फोडणारी टोळी सक्रिय झाली असून, काल (बुधवारी) एकाच रात्री शहरातील दोन मंदिरे फोडण्यात आली. पूर्वाश्रमीच्या पोलिस स्थानक इमारतीजवळील आणि बाजारतील मिळून चोरांनी दोन मंदिरे फोडली. ही दोन्ही देवस्थाने जागृत दैवत श्री कोटेश्वर देवाची आहेत.

मध्यरात्रीच्या सुमारास ही मंदिरे फोडली असावीत, असा अंदाज आहे. महिन्यापूर्वी डिचोली शहरात एकाच रात्री चार मंदिरे फोडण्यात आली होती. आता पुन्हा दोन मंदिरे फोडण्यात आल्याने शहरात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

याप्रकरणी डिचोली पोलिसात तक्रार नोंद करण्यात आल्यानंतर पोलिसांनी चोरीचा पंचनामा करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विराज धाऊसकर याप्रकरणी तपास करीत आहेत.

गस्तीची मागणी

गेल्यावर्षी मंदिरे फोडणाऱ्या चोरांनी डिचोलीत धुमाकूळ घातला होता. लाडफे, कासारपाल, भटवाडी-उसप, सर्वण, मुळगाव या भागात चोरांनी मंदिरे फोडली होती. गेल्या महिन्यात चोरट्यांनी एकाच रात्रीत चार मंदिरे फोडली होती.

आता पुन्हा मंदिरे फोडण्याच्या घटना घडू लागल्याने डिचोलीत पुन्हा मंदिरे फोडणारी टोळी सक्रिय झाली, असे बोलले जात आहे. डिचोली शहरात रात्रीच्यावेळी पोलिस गस्त ठेवावी, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

एक फंडपेटी फोडली, दुसरी पळवली

काल बुधवारी रात्री अज्ञात चोरांनी बाजारातील श्री कोटेश्वर देवस्थान मंदिराचा मुख्य दरवाजा तोडून चोरांनी आत शिरून आहे त्याठिकाणीच मंदिरातील फंडपेटी फोडली. नेहमीप्रमाणे आज सकाळी बाजारातील व्यापारी देवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले असता, चोरीचा हा प्रकार निदर्शनास आला.

फंडपेटीत नेमकी किती रक्कम होती, ते समजू शकले नाही. चोरट्यांनी पूर्वाश्रमीच्या पोलिस स्थानकाच्या मागील श्री कोटेश्वर देवाचे देऊळही लक्ष्य केले. मुख्य दरवाजा तोडून या देवळातील फंडपेटी चोरट्यांनी पळवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

Ballaleshwar Ganpati: पालीचा बल्लाळेश्वर भक्ताच्या नावाने का ओळखला जातो? अढळ भक्तीची ही पौराणिक कथा प्रत्येक गणेशभक्ताने जाणून घ्यायलाच हवी

Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

Margao Stray Dogs Survey: मडगावातील भटक्या कुत्र्यांची, गुरांची संख्या कळणार; पालिकेकडून प्राणी मॅपिंग मोहिमेला सुरुवात, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

SCROLL FOR NEXT