Goa Tourist Attack Dainik Gomantak
गोवा

Tourist Crime News: हरमलमध्ये पर्यटकाच्या सामानाची चोरी; तब्बल अडीच लाखांचे सामान लंपास

अज्ञात चोरटे गुजरातहून आलेल्या पर्यटकाच्या खोलीत घुसले

दैनिक गोमन्तक

Goa Tourist Attack: गोवा हे देशी-विदेशी पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ आहे. मात्र सध्या गोव्यातील पर्यटकांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे देशभरात राज्याचे नाव खराब होत आहे. मागील काही दिवसांमध्ये अशा अनेक घडल्या होत्या. यातच पुन्हा एकदा अशी एक घटना घडली आहे.

माहितीनुसार, हरमल पेडणे येथील एका हॉटेलमधील गुजरातवरून आलेला एक पर्यटक वास्तव्यास होता. यावेळी अज्ञात चोरट्यांनी खोलीत घुसून पर्यटकाच्या सामानाची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये तब्बल अडीच लाखांच्या वस्तू चोरल्याचे सांगण्यात येत आहे.

पर्यटकांवर हल्ला, पर्यटकांच्या सामानाची चोरी अशा घटना वाढल्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, मोरजी येथील इन ग्रँड या हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या पर्यटक रशियन महिलेला दोन कामगारांनी मारहाण केल्याची तक्रार 24 रोजी पेडणे पोलिस स्थानकात नोंद केली.

महिलेच्या तक्रारीनुसार, या हॉटेलमधील कामगार अविनाश गोरिया (वय 29, रा. बदलापूर) आणि मोहम्मद फैजल खान (वय 26, रा. झारखंड) या दोघांवर पेडणे पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

Goa News Live Updates: अनमोड घाटातील रस्ता खचला, वाहतुकीवर परिणाम शक्य

Goa Politics: केजरीवालांच्‍या ‘एकला चलो’चा गोव्‍यावर परिणाम? राजकीय वर्तुळात चर्चा; युतीशिवाय पर्याय नसल्याचे विरोधकांचे मत

No Bag School Goa: गोव्यात भरते ‘बिनदप्तरी शाळा’! कुडचडेच्या ‘सीटीएन’ शाळेचा उपक्रम; विद्यार्थी लुटतात आनंद

Shwetakshi Mishra: अभिमान! श्वेताक्षी मिश्रा यांना उत्तर धृवावर संशोधनाची संधी; ग्रीष्मकालीन तुकडीत सहभाग

SCROLL FOR NEXT