Chhattisgarh News Dainik Gomantak
गोवा

नातेवाईक BJP आमदार तरीही घरात तीन कोटींची चोरी; सोने, चांदी व 10 लाख घेऊन चोरट्यांची गोव्यात पार्टी

आरोपींकडून 3 कोटींहून अधिक रुपयांचा मुद्देमाल आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.

Pramod Yadav

Chhattisgarh News: छत्तीसगडचे माजी मंत्री आणि भाजप आमदार ब्रिजमोहन अग्रवाल (BJP MLA Brijmohan Agrawal) यांचे नातेवाईक पंकज राठी यांच्या घरातील कोट्यवधी रुपयांच्या चोरीचा दुर्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गोव्यातून (Goa) चार आरोपींना अटक केली आहे.

आरोपींकडून 3 कोटींहून अधिक रुपयांचा मुद्देमाल आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. आरोपींनी अन्य चार घरात एक कोटींहून अधिक चोरी केल्याची कबुली दिली आहे.

दुर्ग जिल्ह्यातील जुन्या आदर्श नगर येथील पंकज राठी (Panjkaj Rathi) यांच्या घरात 7 फेब्रुवारी रोजी तीन कोटींहून अधिक रुपयांची चोरी झाली होती. पंकज राठी हे व्यवसायाने सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून माजी मंत्री आणि भाजप आमदार ब्रिजमोहन अग्रवाल यांचे नातेवाईक आहेत.

संपूर्ण कुटुंबासह घराला कुलूप लावून ब्रिजमोहन अग्रवाल यांच्या मुलीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी तो रायपूरला गेले होते. सोमवारी सायंकाळी ते तेथून परतले असता त्यांच्या घराचे कुलूप तुटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे तीन किलो सोने, 18 किलो चांदीचे दागिने आणि 10 लाखांची रोकड चोरून नेली.

दरम्यान, या हायप्रोफाईल चोरीप्रकरणी दुर्ग पोलिसांनी (Durg Police) तात्काळ तपास सुरू केला. या प्रकरणात पथकाने चार आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून 3 कोटींहून अधिक किमतीचा माल जप्त केला आहे.

तीन कोटींहून अधिक रुपयांची चोरी करून चारही आरोपी गोव्यात आले होते. पंकज राठी यांच्या घरी चोरी केलेले 10 लाख रुपये गोव्यात मौजमजा करण्यासाठी वापरत होते. दुर्ग पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन आरोपींचा माग काढला आणि अटक केले.

पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या (Nagpur) चोरांच्या टोळीने एवढी मोठी चोरी केली आहे. या टोळीने पंकज राठी यांच्यासह इतर चार घरांतून 40 लाख, 30 लाख, 10 लाख आणि 20 लाखांची चोरी केली आहे. पोलिसांनी पकडलेल्या नागपुरातील चोरांच्या टोळीचा म्होरक्या अतिशय चलाख आहे. 12 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर काही काळापूर्वी त्याची सुटका झाली होती. त्यानंतर आपली टोळी तयार करून त्याने मोठ्या चोऱ्या करण्यास सुरुवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT