Pirna Temple Theft Dainik Gomantak
गोवा

Pirna Temple Theft: पिर्णातील तीन मंदिरांमध्ये चोरी; फंडपेटी फोडून रोकड लंपास

राज्यात मंदिरांमद्धे चोरी होण्याच्या घटना बऱ्याच प्रमाणात वाढल्या आहेत

दैनिक गोमन्तक

Pirna Temple Theft: राज्यात मंदिरांमद्धे चोरी होण्याच्या घटना बऱ्याच प्रमाणात वाढल्या आहेत. बार्देशमधील पिर्णा येथील मंदिरांमध्ये चोरी झाल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.

माहितीनुसार, पिर्णा, बार्देश येथील तीन मंदिरांमध्ये चोरी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. संशयितांनी या मंदिरांचे मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला व फंडपेटीमधील रोख रुपये लंपास केले.

आज (1 ऑगस्ट) सकाळी मंदिरांच्या पुजार्‍यांना हा चोरींचा प्रकार समजला. चोरट्यांनी पिर्णामधील श्री केळंबिका मंदिर, श्री विठ्ठल मंदिर आणि श्री पांडुरंग मंदिरांना लक्ष्य केले. यावेळी अज्ञात चोरट्यांनी केळंबिका मंदिरातील फंडपेटीतून अंदाजे 5 हजार रोख तर उर्वरित दोन्ही मंदिरातून प्रत्येकी दोन हजार रुपये रोख लंपास केले.

या मंदिरांपैकी केळंबिका मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे असून, पोलिस या सीसीटीव्हीच्या फुटेजद्वारे चोरीप्रकरणाचा तपास करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT