Shree Zareshwar Temple Dainik Gomantak
गोवा

Shree Zareshwar Temple: फोंड्यातील झरेश्‍वर देवस्थानात चोरी; चोरट्यांनी मारला मोठा डल्ला

Shree Zareshwar Temple in Ponda: झरेश्‍वर देवस्थानची फंडपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी हजारो रुपये लंपास केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंड्यातील जुन्या बसस्थानकाच्या एका बाजूला असलेल्या झरेश्‍वर देवस्थानची फंडपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी हजारो रुपये लंपास केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी सकाळी हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.

फोंड्यातील या जागृत देवस्थानात ही चोरी करण्याचे धाडस चोरट्यांनी दाखवले असून चोरट्यांनी फंडपेटीचे कुलूप तोडून आतील पैसे लंपास केले. मात्र चिल्लर तेवढे फंडपेटीत सोडून चोरटे पळाले. आश्‍चर्याची बाब म्हणजे फोंडा पोलिस स्थानकाच्या मागच्या बाजूला हाकेच्या अंतरावर हे मंदिर आहे.

चोरट्यांनी काल पडत असलेल्या पावसाचा फायदा घेत ही चोरी केली असावी, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. या चोरीप्रकरणी देवस्थानतर्फे फोंडा पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी लगेच धाव घेतली व चौकशी केली; पण चोरटे काही सापडू शकले नाहीत. चोरट्यांनी नेमके किती पैसे पळवले त्याचा अंदाज नसल्याचे देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये मृत्यूचं भयानक तांडव! गजबजलेल्या बाजारात अचानक हवाई हल्ला; 49 जणांचा मृत्यू; 58 जखमी, थरारक VIDEO समोर

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

Monsoon: पावसाळा संपायला अवघे 3 दिवस, तरी राज्यात पावसाची मोठी तूट; यंदा 36.41 इंच पाऊस कमी

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

SCROLL FOR NEXT