Margao Minor Abduction Case Dainik Gomantak
गोवा

अपघातात मुलाला आले वंधत्व, म्हातारपणी विरंगुळा नसणार; मडगाव येथून महिलेने बाळाचे अपहरण का केले?

Shreya Dewalkar

Margao Minor Abduction Case

मडगाव आपल्या एकुलत्या एक मुलाला अपघात झाल्याने तो मुलांना जन्म देऊ शकत नाही. त्यामुळे म्हातारपणी खेळवण्यासाठी आपल्याकडे कुणीच बाळ असणार नाही, या चिंतेने नातालिया हिला ग्रासले होते. अशा परिस्थितीत मडगाव रेल्वे स्थानकाजवळ तिला ते दीड महिन्याचे बाळ दिसले.

त्यावेळी मागचा-पुढचा कुठलाही विचार न करता तिने त्याला उचलून नेले. लहान बालिका अपहरण प्रकरणात मडगाव पोलिसांनी अटक केलेल्या नातालिया आल्‍मेदा या संशयित महिलेने पोलिसांना अशी कबुली दिली आहे.

बुधवारी (ता.२१) तिला मडगाव न्यायालयात हजर केले असता सात दिवसांच्या पोलिस कोठडीचा रिमांड देण्यात आला. मूळ गोवा वेल्हा येथील; पण सध्या नावेली येथे राहात असलेल्या नातालिया आल्‍मेदा हिला एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार असून त्यापैकी तिच्या मुलाला एका अपघातांत वंधत्व आल्याने त्याला आयुष्यात कधीच बाळ होऊ शकणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे नातालिया निराश झाली होती.

दोन दिवसांपूर्वी फुटपाथवर झोपलेल्‍या अवस्‍थेत असलेले हे बाळ नातालियाने पळविले होते. हे बाळ म्‍हणजे फक्‍त दीड महिन्‍याची मुलगी होती. तिची आई आश्‍विनी वाघमारेने मंगळवारी मडगाव पोलिस स्‍थानकावर यासंदर्भात तक्रार दिली होती.

स्‍कूटरवरून आलेल्‍या एका महिलेने आपले बाळ पळवून नेले अशी तक्रार तिने दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी नंतर तपास सुरू केल्‍यानंतर त्या महिलेचे घर गोवा वेल्‍हा येथे असल्‍याचे तिच्‍या मोबाईल नंबरच्‍या कागदपत्रांवरून पोलिसांना कळून आले हाेते.

या ठिकाणी ते गेले असता सदर महिला तेथे रहात नसल्‍याचे त्‍यांना कळल्‍यावर अधिक चौकशी केली असता, ती महिला शांतीनगर-आके येथे राहात असल्‍याची माहिती मिळाली. मंगळवारी पोलिसांनी तिच्‍या या घरात जाऊन पाहणी केली असता, त्‍या अपहृत बाळासह ती सापडली.

बाळाच्या सहवासासाठीच अपहरण

मडगाव रेल्वे स्‍थानकासमोरील फुटपाथवर संसार मांडलेल्‍या वाघमारे कुटुंबांकडून आपण त्‍यांचे बाळ आधी विकत घेण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, हे बाळ विकण्‍यास ते तयार नव्‍हते. त्‍यामुळेच मी ते बाळ पळविले. मला त्‍या बाळाचा सहवास हवा हाेता, अशी कबुली या संशयित महिलेने पोलिसांना दिली.

चार लाख देण्‍याची दाखविलेली तयारी

या महिलेच्‍या विरोधात आता भादंसंच्‍या ३६३ (अपहरण) गुन्‍हा नोंद केला असून गोवा बाल कायद्याच्‍या ८(४) या कलमाखालीही तिच्‍यावर गुन्‍हा नोंद केला आहे. सुरुवातीला या महिलेेने त्‍या मुलीच्‍या आईला हे बाळ आपल्‍याला देण्‍यासाठी चार लाख रुपये देण्‍याची तयारी दाखविली होती, अशी माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

वेलिंगकरप्रकरणी 'लुकआऊट नोटीस' जारी! हिंदुत्ववादी संघटनांचे समर्थन; पोलिसांची पथके मागावर

'पोल्ट्री उद्योगाला' सरकारकडून पूर्ण सहकार्य देणार! युवकांनी उद्योग-व्यवसायात यावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Illegal Fishing: गोव्‍याच्‍या समुद्रात धुडगूस घालणारे ट्रॉलर्स जप्‍त! बेकायदा मासेमारीविरुद्ध मत्स्योद्योग खात्याची कारवाई

SCROLL FOR NEXT