Purple Fest Dainik Gomantak
गोवा

Purple Fest 2023: कार रॅलीचा उपक्रम ठरला यशस्वी, देशभरातील 35 स्पर्धक सहभागी

पर्पल फेस्टमध्ये अंधांसाठीच्या कार रॅलीचा उपक्रम यशस्वी झाला

गोमन्तक डिजिटल टीम

वैविध्यतेचा सोहळा ठरत असलेल्या पर्पल फेस्टमध्ये प्रथमच आयोजित अंधांसाठीच्या कार रॅलीचा उपक्रम यशस्वी झाला तसेच ऐतिहासिक क्षण ठरला. या रॅलीमध्ये दृष्टिदोष असलेल्या व्यक्ती या दिशादर्शक (नेव्हिगेटर) होत्या तर ब्रेल लिपीतील नकाशे त्यांचे मार्गदर्शक होते. शनिवारी पार पडलेल्या या अनोख्या कौशल्याचे प्रदर्शन करणाऱ्या रॅलीमध्ये वैयक्तिक स्पर्धकांनी आपले कौशल्य पणास लावत अवलंबनाचा खरा अर्थ सादर केला.

गोवा राज्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते तसेच गोवा राज्याचे विकलांग व्यक्तींसाठीचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री पूजा बेदी यांच्या विशेष उपस्थितीमध्ये अंधांसाठीच्या या कार रॅलीस हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या रॅलीमध्ये देशभरातून आलेले ३५ स्पर्धक आपल्या ३५ कारसह तसेच ४० नेव्हिगेटर स्पर्धक सहभागी झाले होते.

सकाळी १० वाजता आयनॉक्स परिसरात या रॅलीस प्रारंभ झाला. त्यानंतर मिरामार सर्कलला वळसा घालून ही रॅली पणजीतील जुन्या पुलावरून यू-टर्न घेत चोगम मार्गावरून कळंगुट चर्च आणि तेथून परत प्रारंभाच्या ठिकाणीपर्यंत धावली.

गुरुप्रसाद पावसकर म्हणाले की, या अनोख्या अंधांसाठीच्या कार रॅलीसाठी पुढाकार घेतलेल्या रोटरी क्लब ऑफ पणजी आणि त्यांचे सर्व सदस्य यांचा मी खूप ऋणी आहे. पर्पल फेस्ट उपक्रमादरम्यान असे अनेक क्षण प्रत्येकजणांच्या आयुष्यात कायमचे संस्मरणीय ठरणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT