Fog in Goa | Weather in Goa Dainik Gomantak
गोवा

Fog in Goa: राज्याने थंडीसह लपेटलीय दाट धुक्याची चादर!

मागील तीन-चार दिवसांपासून तापमान 20 अंशांच्या खाली आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Fog in Goa: उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे देशभरात सध्या थंडीची लाट पसरली असून गोवाही गारठले आहे. मागील तीन-चार दिवसांपासून तापमान 20 अंशांच्या खाली आले असून, गेल्‍या काही वर्षांत पहिल्यांदाच जानेवारी महिन्‍यात अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्‍यान, चोडण-रायबंदर फेरीबोट सेवाही धुक्यामुळे विस्‍कळीत झाली.

हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेचे शास्त्रज्ञ राहुल एम. यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, थंड झालेली जमीन आणि तयार होणारी हवेतील आर्द्रता(मॉश्चर) यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात धुके पडत आहे. ही स्थिती पुढील 48 तास अनुभवायला मिळेल. आज सोमवारी सकाळी तर दाट धुके पसरले होते. त्‍याचा फटका वाहतूक व्यवस्थेसह सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला बसला.

राज्यातील तापमान

14 जानेवारी : 18.6

15 जानेवारी : 18.4

16 जानेवारी : 18.8

सध्‍याचे धुके म्‍हणजे ‘रेडिएशन धुके’

राज्‍यात थंडी वाढल्यामुळे लोक उबदार कपडे परिधान करू लागले आहेत. ग्रामीण भागात तर शेकोटीचा वापर केला जातोय. तेथे सकाळचे ९ वाजले तरी धुके दाटलेले दिसून येत आहे. वैज्ञानिक एम. राहुल यांच्या मते, पुढील दोन-तीन दिवसांत किमान तापमानात आणखी १ ते २ अंशांनी घट होणार आहे. हवामानात किंवा ऋतुमानात बदल घडल्यावर स्वाभाविकपणे धुके दाटते.

पंरतु कालपासून जे धुके दाटत आहे, त्‍यास ‘रेडिएशन धुके’ संबोधतात. ज्यावेळी आर्द्रता ९५ टक्क्यांवर जाते, त्यावेळी धुके दाटते. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात चढउतार होत आहे. आज सोमवारी पणजीत कमाल ३०.४ अंश सेल्सिअस तर किमान १८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

Goa Politics: मंत्रीपद देतो म्हटलं की धावत येतील, विरोधकांच्या एकीचा उपयोग होणार नाही, 2027 मध्ये गोव्यात भाजपचीच सत्ता; विश्वजीत राणे

Cricket Controversy: "आपसी रंजिश, गुस्सा और खराब भाषा..." ज्युनियर्सवर हल्ल्याच्या आरोपानंतर बांगलादेशी कर्णधाराचा मोठा खुलासा, पोस्ट करत म्हणाली...

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

SCROLL FOR NEXT