Goa Taxi Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: दाबोळी विमानतळावरील टॅक्सीचालकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील स्थानिक टॅक्सी चालकांचा प्रश्न अद्याप कायम

Akshay Nirmale

Goa Taxi Manohar International Airport: गोव्याच्या मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील स्थानिक टॅक्सी चालकांचा प्रश्न अद्याप मिटलेला नाही. त्यातच आता दाबोळी विमानतळावरील टॅक्सी चालकांनी मुख्यमंत्र्यांकडे एक मागणी केली आहे.

दाबोळी विमानतळावरील काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांना मोपा विमानतळावर सामाऊन घेण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे करण्यात आली आहे. भविष्यात दाबोळी विमानतळावरील व्यवसायाावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती या टॅक्सीचालकांना वाटत आहे.

त्यातून स्वतःच्या सुरक्षित भविष्यासाठी या टॅक्सीचालकांनी ही मागणी केली आहे. या मागणीवर आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

कारण अद्याप खुद्द मोपा विमानतळावरील टॅक्सीचालकांचा प्रश्न सुटलेला नाही. स्थानिक टॅक्सीचालकांनी मोपावर स्वतंत्र टॅक्सी काऊंटरची मागणी केली होती तसेच रेंट द कार आणि इतर खासगी टॅक्सींवर बंदी आणावी, अशी मागणी केली होती.

त्यानंतर गोवा सरकारने स्थानिकांसाठी गोवा टॅक्सी अॅप सुरू केले. स्थानिक टॅक्सी चालकांना त्यावर नोंदणी करायला सांगण्यात आलेले आहे.

पेडणे तालुक्यातील टॅक्सी व्यावसायिकांसाठी ‘ब्ल्यू कॅप टॅक्सी स्टॅंड’ देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले होते. पण ते पुर्ण होण्याच्या काहीच हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे आंदोलनाचा इशाराही येथील टॅक्सीचालकांनी दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lumpy Disease: डिचोलीत जनावरांना 'लम्पी'ची लागण, सिकेरीतील गोशाळेत उपचार सुरू

Goa Doctor: डॉटरांच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसविषयी राज्यधोरण हवेच!

Paresh Joshi: धड पडेपर्यंत इतरांसाठी धडपडणारे, परक्यांसाठीही ईश्वर ठरलेले 'परेश जोशी'

'लोकांची घरां कोण मोडता तें हांव पळयता'; CM सावंतांचे विरोधकांना प्रत्त्युत्तर, बेकायदेशीर प्लॉटिंगवरून विधानसभेत वाद

Pigeon Feeding Ban: सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यावर बंदी घालावी, विजय सरदेसाईंची मागणी

SCROLL FOR NEXT