Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: ‘त्या’ पोलिस निरीक्षकाचे निलंबन मागे का?

Goa Police: आपचा आक्षेप: मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाची मागणी

दैनिक गोमन्तक

Goa Police:

कुंकळ्ळी पोलिस स्थानकात कार्यरत असताना एका व्यवसायाकडून दहा लाख रुपये खंडणी घेतल्याच्या कथित आरोपावरून निलंबित झालेल्या पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यास पुन्हा सेवेत घेतल्याबद्दल आम आदमी पक्षाने आक्षेप नोंदविला आहे.

चव्हाण याचा तपासणी अहवाल पोलिस खात्याने सार्वजनिक करावा, त्याचे निलंबन मागे घेण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आपने केली आहे.

आपच्या कार्यालयात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेस संदेश तेळेकर देसाई, कार्यकारी अध्यक्ष वाल्मिकी नाईक व सरचिटणीस सुरेल तिळवे यांची उपस्थिती होती. तेळेकर देसाई म्हणाले, चव्हाण याने एका व्यावसायिकाकडून दहा लाख रुपयांची खंडणी घेतली होती, त्याबाबत आम आदमी पक्षाने आवाज उठवल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 7 सप्टेंबर 2023 मध्ये चव्हाण याला निलंबित करून चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

परंतु ज्यावेळी त्याला निलंबित केले, त्यानंतर त्याला पुन्हा सेवेत घेतले, परंतु त्याची सेवा ही अखंडित ठेवण्यात आली. त्यामुळे निलंबनाची कारवाई होऊनही ती सुटी भरपगारी झाली.दोन महिन्यानंतर त्या खंडणी प्रकरणाची चौकशी हा केवळ फार्स असल्याचे दिसून येते.

या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही सहभाग असावा काय, असा सवाल उपस्थित होतो. पोलिस खात्यात अत्यंत गंभीरपणे काम करणारे अधिकारी आहेत, त्यांच्या नैतिकतेला बाधा पोहोचवणारे चव्हाण यांचे प्रकरण नक्कीच आहे, असे तेळेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT