Gauri Achari Murder Case  Dainik Gomantak
गोवा

Gauri Achari Murder Case: गौरीच्या खुनातील संशयिताला जामिन नाहीच! पणजी कोर्टाने फेटाळला अर्ज

मैत्री नाकारल्याने 2022 मध्ये गळा आवळून केला होता खून

गोमंतक ऑनलाईन टीम

Gauri Achari Murder Case: सन 2022 मध्ये ओल्ड गोव्यात घडलेल्या प्राध्यापक गौरी आचारी खून प्रकरणात पणजी सत्र न्यायालयाने मंगळवारी संशयित आरोपी गौरव बिद्रे याचा जामिन अर्ज फेटाळला. त्यामुळे त्याला तुरूंगातच राहावे लागणार आहे.

गौरी खांडोळा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. तिचा गळा आवळून खून करण्यात आला होता. कदंब पठारावरील झाडीत तिचा मृतदेह टाकून देण्यात आला होता. जुने गोवेचे तत्कालिन पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांनी या प्रकरणाताच तपास करत संशयित गौरव बिद्रे याला 24 तासात अटक केली होती.

त्यानेही खुनाची कबुली दिली होती. घटनेपूर्वी गौरवला गौरी हिच्यासोबत जुने गोवे येथील प्राईम रोज इमारतीजवळ पाहिलेल्यांच्या साक्षी पोलिसांनी नोंदवल्या आहेत. काही महिन्यांपुर्वी गौरव बिद्रे याला कोलवाळ कारागृहातील कैद्यांनी मारहाण केली होती.

या प्रकरणी न्यायालयाने तुरूंगाधिकाऱ्यांना उत्तर सादर करण्यास सांगितले होते. गौरव बिद्रेने सौझा लोबो रेस्टॉरंट तोडफोड प्रकरणातील संशयित छोटू व इतर दोघे मिळून तिघांनी मारहाण केल्याची तक्रार केली होती. या मारहाणीत त्याचे पुढील दोन दात तुटले होते. त्याने तेव्हा सुरक्षेच्या दृष्टीने इतर खोलीत हलवावे, असेही म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईला आम्ही कंटाळलो! 'गोवा काँग्रेस पक्ष' नोंदणी प्रक्रियेसंदर्भात कोर्ट नाराज

VIDEO: वकिलाची गाडी अडवून मारहाण अन् शिवीगाळ, आमदार पुत्राची गुंडगिरी; तक्रारीनंतरही FIR नाही, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल!

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये मृत्यूचं भयानक तांडव! गजबजलेल्या बाजारात अचानक हवाई हल्ला; 49 जणांचा मृत्यू; 58 जखमी, थरारक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT