Dudhsagar Waterfall Dainik Gomantak
गोवा

Goa Waterfalls: जुजबी माहितीवरच धबधब्यांचे वर्गीकरण; वन खात्याचा ‘अभ्यास’ कच्चा

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे बजावले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Waterfalls: अभयारण्ये व वन क्षेत्रातील धबधब्यांची धोकादायक, मध्यम धोकादायक आणि कमी धोकादायक अशी वर्गवारी करण्यासाठी धबधब्यांच्या धारण क्षमतेचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचा मुद्दा राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या बैठकीत गेल्या वर्षी २० नोव्हेंबरला चर्चेला आला होता.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे बजावले होते. असे असतानाही वर्ष होत आले असतानाही वन खात्याने तसा अभ्यास करवून घेतला नाही. मात्र, जुजबी माहितीच्या आधारेच असे वर्गीकरण केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

या बैठकीत धोकादायक धबधब्यांच्या ठिकाणी जीवरक्षक नेमण्याविषयीची सूचना मुख्य वन्यजीव संरक्षकांनी केली होती. त्याची पूर्तता नंतर झालेलीच नाही. त्यांनी नमूद केले होते की, आठवड्याच्‍या अखेरीस एकेका धबधब्यांवर पाचशेच्‍या आसपास लोक भेट देतात. ते बेशिस्त वागतात. त्यामुळे धबधब्यांच्या ठिकाणी पोलिस तैनात करावेत. त्या गोष्टीची दखल वर्षभरानेही घेतलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी प्रशिक्षित निसर्ग मार्गदर्शकांना सामावून घेण्याची सूचना केली होती. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी दूधसागर धबधब्याच्या धर्तीवर व्यवस्था केली जावी, अशीही सूचना केली होती.

सद्यस्थितीबाबत माहिती घेतली. वनमंत्री विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांच्या म्हणण्यानुसार कमी धोक्याच्या १६ धबधब्यांवर प्रवेशास मुभा देण्यात येईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी यादी मागवून घेतल्यानंतर कमी धोक्याच्या धबधब्यांवर जाण्यास परवानगी देता येईल. अन्यथा पावसाळी पर्यटनावर परिणाम होईल, असे सांगितले. त्यामुळे धबधब्यांवर जाण्यासाठी सरसकट घातलेल्या बंदीचा फेरविचार कऱण्यास वाव आहे.

एकत्रितपणे काम करू

खंवटे पुढे म्हणाले, "मी हा मुद्दा मुख्यमंत्र्यांकडे आधीच मांडला आहे. आम्ही वनमंत्री विश्वजीत राणे यांच्यासोबत बसून या प्रश्नावर तोडगा काढणार आहोत. तसेच आम्ही काही सुरक्षित धबधबे आणि जे धोकादायक आहेत, ते निश्चित केले आहेत. काही दिल्लीतील (Delhi) अधिकारी येथे येऊन अशी अचानक धबधब्यांवर बंदी घालू शकत नाहीत.’ या असल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करून यांच्यावर तोडगे काढावे लागतील.

१७ धबधब्यांची पुन्हा पाहणी

राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नवीनकुमार यांनी सांगितले की, धबधब्यांची वर्गवारी करण्यासाठी कोणताही शास्त्रीय अभ्यास झालेला नाही. धबधब्यांकडे जाणारा मार्ग निर्धोक आहे का, धबधबा कोसळण्याच्या जागी असलेला पाण्याचा प्रवाह, पाऊस पडला तर तेथे किती पाणी वाढू शकते, याचा अंदाज गेल्या वर्षी केलेल्या पाहणीच्या आधारे घेतला आहे. त्या आधारे गेल्या वर्षी १७ धबधबे कमी धोक्याचे मानले गेले होते. आता यंदा त्यांची पुन्हा पाहणी करण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT